**दुःख विकता येत नाही....लेख***


"कालच वाचनात आलं आपलं दुःखही विकता आलं पाहिजे."
"अरे दुख विकता येत नसतं म्हणावं."
" ते काळजात असतं."
" यातनांनी भरलेल्या संवेदनांचं असतं."
" संवेदना,काळज कुठं विकता येतं का?
"संवेदना मूल्यकिंमतीच्या बाजारात बसविता येत नाही."
                 "कदाचित दुःख,क्लांत उत्पादित करणारे हे विकायटिकायकची भाषा करतील. ती सोसणारे कधीही विकायची करू शकणार नाही. ते जर त्यांनी विकू पाहिले तर त्यांच्या संवेदनांना बाजारी मूल्य प्राप्त होईल.आणि संवेदनाहीन जिणे येईल. जणू मढ्यासारखे."  
                    "व्यथा,दुःख,क्लांत शब्दात बांधता येत नाही. किंवा चीजवस्तू म्हणून बाजारी विकायलाही ठेवता येत नाही.कलेने शब्दाला बांधता येईल वा एखाद्या वस्तूला विकताही येईल.पण; व्यथा,क्लांत दुःखं नाही."  
                    "व्यथा ही कला आणि शब्दांच्याही सीमांत अशी बाब आहे.ती शब्दातीत आहे.हो....हो...ती काळाने
झिजुन जाईल.पण; तिची किंमत होऊ शकणार नाही.दुःख,व्यथा,क्लांत यांना लिहिणारे हात त्यांना शब्दांत बांधण्याचा निष्फळ यत्न करतात.नाना शब्दालंकराच्या जाळ्यात अडकविण्याचा मगरजाळ तयार करतात.पण; विचारा त्यांना या विश्वसागरातल्या दुःख,क्लांत,व्यथेला पकडता येतं का?
             नाहीच येणार.दुःख एका शब्दाने, व्यथा एका अलंकाराने नि क्लांत एका उपमार्थाने व्यक्त करता येत नाही.अमाप असा तो व्याप्त अर्थत्व असलेल्या दुःख,क्लांत,व्यथेला काही शब्द,अर्थ अलंकाराची मर्यादा घालणे किती वायफळीचे विवेक करणे म्हणावे...???
चिमटीत पाणी धरल्यासारखेच ते सारे....!"


Comments

Popular posts from this blog