***सैराट***
(एक चित्रपट परीक्षण)
"नागराज मुंजळे- एक वैचारीक झंझावात...."

1)यांनी जुन्या वाईट चाली रीती मोडीत काढत नवीन चांगल्या समाजोपयोगी प्रथा या चित्रपटातून दिल्या आहेत.
2)अर्चनाच्या माध्यमातून समाजात स्त्री चे काय स्थान पाहिजे याचे एक संशोधनपर पात्र चित्रीले आहे.
3)चित्रपट सृष्टीतील वंशीय मक्तेदारी झुगारून चित्रपटाचा नायक हा सर्वसमान्यही असू शकतो हे शुद्धपणे सिध्ध केलेय.
4)ग्रामीण भागात अजूनही आंतरजातीय विवाहाचे सामाजिक वास्तव दाहक चित्रण करून सत्यसत्व रेखाटले आहे.
5)प्रेम केलं,पळून आलो,पण पुढं भागवायचं कसं हा वास्तवदर्शी प्रश्न प्रेमी तरुणांसाठी ठेवलाय.
6)अप्रतिम ग्रामदर्शन,शब्दफेक रुळणारी,कमी खर्चात जास्त सादरीकरण,विदीर्ण समाजवास्तव,मिसरूढ वयात प्रेमात अडकलेला जीव,समाजरूढीचे जाचक निर्बंध,निरपेक्ष मित्र आदिंचे योग्य सांगड घालून अर्थपूर्ण भावस्पर्शी चित्रण केल्या गेले आहे.
7)वर्गीय वंशभेद,राजकारण,समाजकारण,पाटीलकी,गावकी वा रावकीचे सुस्पस्ट दिगदर्शन यात आढळते.
8)आपल्या जोडीदारावर विश्वासाशिवाय आपण प्रेमामृतुल्य हे जीवन यशदायी प्राप्त करूच शकत नाही याचाकटूसत्यनुभव रेखाला आहे.
9)प्रेमाच्या मार्गावर "सैराट" झाल्याअल्पकालीन वयाच्या प्रेमीयुगलांना चित्रपटात वेगळं आणि सत्यात घडते वेगळं हे सत्य कथन मांडणारा विचार फैलवणारा हा चित्रपट आहे.
10)तरुणांनाही"सैराट"होऊन आता काय केलं पाहिजे?म्हणजे पुन्हा हा "दुखसैरांट"समाजाच्या धुखऱ्या खाचा फोडणार नाही यासाठी अशी व्यवस्था झुगारून संघर्षलं पाहिजे.
हेच "सैराट"काकुळतीनं सांगत आहे...!"
.....................................................................................................................

Comments

Popular posts from this blog