***सवांद***
"कोणी सांगत
आहे म्हणून नाही लिहायचं.स्वतःला वाटलं म्हणून योग्य ते लिहीत जा.आणि असं होतं या
अवस्थेत.कडक उन्हात नवी रोपं करपावी तसे नवखे लिखानकार होरपाळल्या जातात.प्रस्थापित
झाडं जशी नव्या पालवींना सूर्य दिसू देत नाहीत तसाच हा साहित्यातील ढगाळपणा.
तरुणांनी भरपूर वाचलं पाहिजे.ते समजून घेतलं,विचारलं
पाहिजे.मंथन केलं पाहिजे जुन्या नव्या विचार संकल्पनांचं.चांगलं काय?वाईट काय?सदविवेकाच्या नजरेनं वास्तव-भूत-येणारं
आयुष्य पारखलं पाहिजे.व्ययस्थेत कनकाला तोलणारे गुंजखडे मापानं उभेच आहेत.जोखीम
म्हणावी तर अनंत पिढ्या या अज्ञानाने गंजल्या आहेत.टळतील असे दिवस स्वतः टाळावे
लागतात.ज्ञानाच्या जंतर तलवारीने धर्मांध व अज्ञानत्वाला चरचर कापायचे आहे.आणि ही
खांदेपालट काळानुसार स्वीकारली पाहिजे. थकलेल्या लेखणीचे श्वास तरुण झाले
पाहिजे...!"
Comments
Post a Comment