***साहित्यिक संभाजी***
"गेल्या चार
वर्षाखालील गोस्ट.त्या दिवशी म्या कंपनीची पहिली शिप करून मित्रांसोबत तुळापूर ला
गेलो होतो..तिथे संभाजी राजेंच्या हयातीतील शेवटच्या अस्तित्वाची आजच्या काळात
असणारी स्थिती अनुभवली.आणि अध्यापकीय शिक्षण घेतांना वाचलेले पुस्तकं,संदर्भ,सारं सारं पुढं पुण्यात आल्यावर इतर वाचनात
आलेलं आजही आठवतं.. .
"कर्मठ ब्रम्हण्यवाद हा स्वराज्याला लागलेला कीडसंसर्गजन्य आजार आहे.आणि तो विवेकाने नष्ट केला पाहिजे.तर आजीच्या आणि आजोबाच्या संकल्पनेतील मानवतावादी स्वराज्याचे पालन होईल!"
ही छत्रपती शिवरयांकडून शिकवण मिळालेले लढाऊ-साहित्यिक संभाजी काव्य,साहित्य, पुराण,संगीत,धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेल्या अनुभवी जीवनाने वयाच्या १४व्या वर्षी "बुद्धभूषणम" हा संस्कृत ग्रंथ रचतात आणि तत्कालीन राज्यप्रशासन कसे चालवावे,काय नियम असावेत याचे विवेचन करतात.राज्यशासन,कर्म सिद्धांतन,आणि आर्थिक घडामोडीचीे सर्वार्थाने चिकित्सा लिखाणातून उतरवतात.बुधभूषणमध्ये शेषनाग,गरुड,जीभ,भ्रमर, कुंभ,मीन(मासा),उंट,दुंदुभी,निंबवृक्ष,सोने इत्यादी विषयावर एक-एक तर सूर्यासंबंधीचे ७,चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३,मधुकर(भ्रमर)संबंधीचे ७,हंसाविषयीचे ५,हत्तीसंबंधीचे ५,विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.वास्तविक बघतासुमारे एकोणनव्वद विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची,वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपव्याकरणीक संदर्भाने व्यंगदर्शन खुबीदारने वापर या ग्रंथातल्या श्लोकांत सापडतो.याचबरोबर नखशिख(नखशिखांत),नायिकाभेद,सातशक हे साहित्य लिहितात.त्यातून व्यापार,व्यवसाय,स्वराज्य तिजोरीची यथार्थ बीजगणित ते सांगतात.आर्थिक मक्तेदारी नाकारत सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी तलवारीच्या धारेने मरायला नि मारायला मागेपुढे न बघणारा विवेकी विचार स्वराज्य टिकविण्याचा यत्न करतो.राजदरबारी असलेला कवी कलश,महाकवी भूषण,गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या तत्वज्ञान प्रभावाने आणि खरे तर शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्र साहित्यनिर्मिती केली.ग्रंथाच्या साकल्यपूर्ण विश्लेषणात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादीविषय आशय येतात. यासाठी संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली.
"कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: । जगत: पतिरंशतोवतापो:(तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय:....!"
यातील भुजंग,वसुधा,विळखा,जग आदी संकल्पना व प्रतिमा,प्रतीके तत्कालीन शिवराज्यस्व काळाचे वर्णन करीत नवा रचनात्मक बांध संसकृसाहित्यात ते आणतात.राजकीय धोरण,आर्थिक धोरण,प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो.परंतु एक घटनेवर त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.तरुण संभाजीचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद दिसून येतात.त्यांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता.शिवाजींनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले.पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते.कारण भ्रष्ट व्यवस्था स्वराज्याला वाळवीसारखी पोखरते हे तरुणपणातच संभाजीनी न्यून ओळखले होते.यामुळे परकीयांसोबतच स्वकीय अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.हे "नायिकाभेद" या ग्रंथाच्या काही तत्वांशात दिसुन येते.हा लेखक-साहित्यिक म्हणून संभाजीचा स्वविवेक इथे स्वयंफुलीत दिसतो.संभाजीच्या साहित्य लिखाणात मुख्यविषय जनता व व्यवस्था अश्या संदर्भाने बघता.राजनीती,धर्मशास्त्र नियमतत्व,गणव्यवस्था,अर्थ समाजकारण,सामजिक निरीक्षण व उद्बोधन हा आहे. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत.प्रथम दर्शनी लक्षात येते,ती महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपति संभाजी महाराजांनी प्राचीन ग्रंथांचा केलेला सखोल अभ्यास. त्यांनी या ग्रंथात समाविष्ट केलेल्या श्लोकांची वर्गवारी त्यात आढळणारी नीरक्षीरविवेकता, रचणेेतील प्रदर मांडण्याचे कौशल्य हे सारे अष्टपैलू व्यक्तित्वाची चेतनगुणोक्ती सजीवसंकेत.राजनीतीची शास्त्रीय भूमिका मांडताना छत्रपति संभाजी महाराजांनी अनेक पुराणादी व तत्कालीन ग्रंथांचा सूक्ष्म व चिकित्सकपणे अभ्यास केला आहे.त्यात महाभारत,मनुस्मृती,कामन्दकीय नीतिसार,विष्णुधर्मोत्तर पुराण,मत्सपुराण ही सारी छत्रपति संभाजी महाराजांची अध्ययन क्षेत्रे आहेत,हे लक्षात येते.विविध पुराण ग्रंथातून "राजनीती" या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण,श्लोकांना विषयानुरुप अशी शीर्षके,हे काम कुणी महाज्ञानी,बुद्धीयोगीच करु जाणे.या ग्रंथातील वैशिष्ट्ये,विशेषत-राजनीतीसंबंधीचे छत्रपतींच्या ठायी आढळणारी ज्ञानगांभीर्यता महा महा विद्वानांनी वाखाणावी अशी आहे."
"अपसर मधुकर दूरं परिमल बहलेपि केतकी कुसुमे |
इह नहि मधुलवलेशी भवति परं धूलिधूसरं वदनम |ऽ...!"
अर्थ - या केवड्याच्या फुलाला भरपूर सुवास आहे,परंतु हे मधुपा! तू मात्र त्याच्यापासून दूर जा.त्याच्या फुलांत मधाचा कण मात्र अजिबात नाही.(तू जर त्याच्याजवळ गेलास तर)तुझे तोंड मात्र त्याच्यावरील केवळ शुष्क परागकणांनीच माखले जाईल / म्हणजेच ते केवळ हकनाक धुळीने माखले जाईल, मलीन होईल.
"काकै-सह विरुद्धस्य कला गिर- |
खलसेपि नेष्ठुर्य कल्याणप्रकृते- कुत- |ऽ...!"
अर्थ -- कावळ्यांच्या बरोबर वैर असणार्या कोकिळाचे शब्द हे कलात्मकच असतात. उदार (सज्जन) स्वभावाच्या माणसाचे ठायी दुष्टांच्या सहवासात देखील निष्ठुरता, कर्कशता कशी येणार?
संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साहित्यभूषण,प्रस्तुत ग्रंथाचा नेमका आढावा घेताना म्हणतात "छत्रपति संभाजी महाराजांचे शिक्षण,विदेशी दृष्टीकोन आणि परिजन्यक अवस्था मांडत असतांना मानसशास्त्रीय,अनुवंश-नैतिक-भावनिक-वैज्ञानिक-जैविक संदर्भ त्यांच्या लिखाणातून दिसून येतात.

आज त्यांची
जयंती-मनाचा मुजरा...लेखणीला सलाम!
टीप-
1-बुद्धभूषणम-१.१०३/पृ.१८४
2-छत्रपती संभाजी महाराज विरचित - बुधभूषण-राजनीती - रामकृष्ण कदम
3-संभाजीकालीन पत्रसार संग्रह (शा.१६०२ - शा.१६१०) : संपादक - शंकर नारायण जोशी; प्रकाशक भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) (पहिली आवृत्ती - १९४९; नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)

………………………………………………………………………………………
Comments
Post a Comment