***प्रासंगिक***
★★★घाटमाथ्यावरची "ताकद" ठरली महाराष्ट्र्र केसरी★★★
घाटमाथ्यावरची बुलडण्यातील रांगड्या मानसिकतेची ताकद मातीत उमटून निघाली.आणि तिने "बाला रफिक शेख" नावाचा महाराष्ट्र केसरी घडविला.
"मलं आत्मविश्वास व्हता की,मी फायनललं जाईन.कारण मही प्रॅक्टिस तशीच व्हती.येक विश्वास व्हता.अन त्यामुळंच सहजासईज फायनललं गेलो.मह्या आजूबा पंजुबापासून कुस्ती खेळण्याचा वारसा हाये.लखन चांगला खेळ करत व्हता.कुस्ती जिंकत व्हता.त्याच्यावर अपेक्षा व्हती.घरची परिस्थिती जरी अशी असली तरी मी खेळत व्हतो.कधी कधी शाळा पण बुडाली या नांदामूळं.पण ह्यो आनंद उभ्या महाराष्ट्राचा हाय..."
-बाला रफिक शेख(महाराष्ट्र केसरी)
"बाला हा आपल्या बंधूंमधील तिसरा भाऊ.दोघायची कुस्ती इतकी धारदार नस्ल्याने कुटुंबाने बालावर ध्यान देत करत त्याला पपुढं सरकवलं.गेल्या पाच पिढ्या कुस्तीत असलेल्या बाला शाळेपेक्षा कुस्ती आवडायची.तो आता बारावीचं शिक्षण घेतोय, कुस्तीत त्यानं स्वतःला उत्तम घडवलंय, पिळदार शरीरयष्टी ठेवली हाय."..........हे सांगताना आझम शेख यांचे डोळे पाणावले होते.
"गेल्या सात- आठ वर्षांपासून कुस्तीच्या आखाड्यात लैय मेहनत करणाऱ्या या मल्लाला दीड वर्ष दुखापतीमुळे आखाड्यापासून लांबच काढाव लाग्ले.त्याचा स्वभाव लैय शांत.म्हणून तो कोणाची कुरापत काढायच्या भानगडीत पडत नस्तो."
-आझम शेख.(बालाचे वडील)
"तो माझ्या लहान भावासारखा आहे.त्याच्याकडून कसून तालीम करून घेतली आणि कुस्तीची सखोल कस लावून घेतली.त्याच्या प्रयत्नाने तो जिंकला आहे.त्यामागे त्याची मेहनत मोठी आहे.बाला सकाळी चारला पर्वतीला असायचा.व्यायाम,व लढत करायचा.नंतर नांदेडसिटीला चक्कर करायचा.धावायचा.
-गणेश घुले(बालाचे ट्रेनर)"
काल महाराष्ट्र केसरीची जालना इथं सुरू असलेली कुस्तिची दंगल लक्षवेधी ठरली. बुलडाण्याच्या बाला रफिक शेख याने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव करत मानाचा महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला.अतिशय काट्याची लढत अभिजित आणि बालामध्ये झाली.पहिल्या काही फेऱ्यानंतर बाला वरचढ ठरला त्याने टाकलेले डाव अभिजितला उलटवता आहे नाही आणि बाला विजेता ठरला.मंत्री अर्जुन खोतकर, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा देण्यात आली. मैदानावर जोरदार जल्लोष झाला. लोकांनी आणि समर्थकांनी बालाला डोक्यावर घेतलं आणि रोजदार घोषण दिल्या.पुण्याच्या अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती.मागील वर्षी चॅम्पियन बनलेल्या अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं.प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके आणि बुलढाणा इथल्या बालारफिक शेख यांच्यातला सामना जोरदार रंगला.
बाला रफिक शेख 62 व्या वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे.गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले आहे.अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान असला तरी.बाला रफिकने त्याच्यावर मात केली आहे.तिसऱ्यांदा मॅट विभागाची सेमीफायनल जिंकून अभिजीत फायनलमध्ये पोहोचला होता.परंतु बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने हा सामना एकतर्फी जिंकला आहे.पुण्याचा अभिजीत कटके की बुलडाण्याचा बाला रफिक शेख कोण होणार 'महाराष्ट्र केसरी' याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली होती.जालन्याच्या आझाद मैदानात आज सायंकाळी दोघांमध्ये सामना झाला.या सामन्यात बालाने गतविजेत्या अभिजीतवर मात केली आहे.किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी सांगितले. बालाने अभिजित कटकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकाविली.
घाटमाथ्यावरील बुलडाणा ते कोल्हापूर प्रवास-
मूळ बुलडाण्याचा असलेल्या बालारफिक शेखने आपल्या कुस्तीला धार देण्यासाठी मोठा कालावधी कोल्हापुरात घालवला आहे. जून 2018 पासून त्याने पुण्यातील गणेश दांगट यांच्या हनुमान आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्याला गणपतराव आंदळकर, वांजळे वस्ताद यांनी घडवले असल्याचे आझम शेख यांनी सांगितले.मॅटवर आठवड्यातून दोनदा तो माती गटाचा यंदाच्या केसरी स्पर्धेत बादशाह ठरलेल्या बालारफिक शेखने महाराष्ट्र केसरी गटाची अंतिम फेरी मॅटवर असल्याने आपल्या सरावात बदल करून आठवड्यातून दोनदा मॅटवर सराव करण्याचा शिरस्ता राखला असल्याचे त्याचे वडील आझम शेख यांनी सांगितले. आता सध्या तो साडेचारला उठून पर्वती पालथी घालून सरावाला सुरवात करतो. मातीतील मल्ल असला, तरी जिममध्ये तो व्यायाम करण्यात वेळ घालवतो, असे आझम शेख काळजातून बोलत होते.सोलापूर ,करमाळा वातावरणातून बरंच शिकायला मिळालं.ते जग खूप प्रेरणादायी आहे.अशीही एक सहज आठवण ते करतात.
जालन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात बुलडाण्याच्या बाला रफिक शेखनं गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी अभिजीत कटकेला पराभवाची धुळ चारली.संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून टाकणाऱ्या या सामन्यात बाला शेखनं 11-03 अशा फरकानं अभिजित कटकेला मात दिली.अतिशय काट्याची लढत अभिजित आणि बालामध्ये झाली.यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते बाला रफिक शेखला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष करत बाला शेखला डोक्यावर उचलून घेतलं होतं.या विजयानंतर बाला शेखचं कुटुंब अतिशय भावूक झालं होतं.आनंदाश्रू आवरणं त्यांना कठीण झालं होतं.
राज्यासह देशभरातील अनेक नामवंत मल्ल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींसह कुस्तीप्रेमी तरुण मोठ्या संख्येने या लढतील पाहण्यासाठी सहभागी झाले होते.




Comments

Popular posts from this blog