शेर मराठी 

हा काव्यसंग्रह लेखनाचे क्चचे काम दि.12/12/2011 पासून सुरु ते 93 वि कविता
हि29/11/2012 ला शेवट.तद्नंतर च्या कविता ह्या गीतरचना होय.काही कविता आहेत. या संग्राहाचे टॅन्कनलेखन दि.22/12/2016 रोजी चालू झाले. ***
गीत 

मनु म्हंन्ला 
तोंडातून आला 
त्यो बामन झाला
उग्ला दंडातून 
ज्यो असा त्यो 
क्षेत्रीय झाला
वैसी पोटासी 
गेला बोंबीतून 
ह्यो जन्मला
सुद्रालं घाला
तळाला त्याचं 
जग्नं रास्त 
नाही रे

गात मात वात रात हात खात बात आत कात घात नात दात भात ज्ञात नहिरे


मम कवनांचे कायेवरति
शृंगार कलपनेचे न जडले
पाहिले,दिसले,अनुभवले
सारेच ते शबदकवन घडले!"




आम्चं इध्यापीठ***

"आम्चं इध्यापीठ घर
नाना प्रज्ञेचं जंव्जाळ...
पेटती मशाल इथं
सारे घडतो सुर्याळ...!"


काय सांगू गुरु अशीच दरी हाय हाय
सिर्मत्तीं सारं काय गरिबीच्या घरी हाय....?"


गीत

हाल गये
हवाल गये
रह गये
दात ये बाकी
उतने में थोडी
हसीं आगयी
और मुस्कुराके
चल गये..!

तुका

तव भेटी आलो 
तुका न उरला जगाशी
चहू दिशी गेलो
तुकाशी न मिळे विश्वाशी


"चंद्र व भाकरीपेक्षा मोठी ती इभ्रत!"
वाह .....
"धारदार गझल ही शब्द सार आहे
भावातीत नाते आज स्तब्ध वार आहे...!"




आत आता उरफाटे
सारे जमले भयचीत
नदी तीरी सूर्यतनु तेवता भर्जरी 
मनी भिर्भरी विचार पाखरू फिरी
जल थल सूर्य तेज
मन भर भंर्य सेज


नैतिकता पाळण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांना शील असे म्हणतात!

अनित्य दुःख आणि अनात्म मनात आणि शरीरात स्वानुभूतीवर जाणने यालाच प्रज्ञा असे म्हणतात!


मान्सं जगत नस्तात....!"

"ज्या लेखणीने सत्य सारा विश्व चालतो आहे
आज खरा विश्वातला माणूस बोलतो आहे...!"
-[विश्वनाथ साठे]

"सुरुंग जातील फुटल्या पहिली 
जात फोडणे आहे
उतरंडी येवस्थेचे ह्या युगायुगांच्या
रीत तोडणे आहे...!"
***दगडझुक्यांनो.......!***

"विश्वात्ला कोंत्ताच दगड ह्यो सजीवंत नस्ल्यानं सजीवाय्ची दुःखं,वरड,सुखं,क्लांत,दाह त्यो उम्गु शकत नाही...!"


                                






***पोवाडा***

ऐका ऐका ठेवुनी भान
डफावर्ती थाप तुंतुण्या ताण
शाहीर हा विश्वाचा प्राण
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
नमन करुनि प्रारंभे गावुनी स्तवन आरंभे
जयभीम हा प्रणाम
गातो भिमाचे गुणगाणं आ sss sss
ज्ञानाचा ज्ञानी तो प्राण रं
                             जिरं हा जिरं जी
ज्ञानाचा भानू तो क्रांतीची प्रभात
दिव्य परिवर्तनाची हो जिद्द उरात
करुणेचा सागर प्रज्ञेचा आगर
धम्माचा पाझर भीमाच्या घरात
कबीरपंथी होतं घराणं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
जातीभेद माजला त्या काळी
जशी अफूची ती गोळी
मानवा तव अस्पृश्यता जाळी
स्पर्श जाहला सवर्णा जरी
कलंक लागे मांगामहारा शिरी
षडयंत्र पोसलं अधर्मांनं रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
अठराशे एक्यांन्नव सलाला
महू गावाला मध्य प्रांताला
अधर्म विनाशक जन्मा आला
नभी धम्माचा सूर्य उगला
भीम मग नामकरण रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
रामजी कडक शिस्तिचे धडे सत्याचे
भीमा घडे नाते रक्ताचे 
रोकडे संस्कार सद्धर्माचे पडे
खडे सक्तीचे गुण भीमाला जडे
शिकवण थोर सद्वर्तनानं रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
व्यवस्थेनं ठेवलं वर्गाबाहीर
होती जात म्हणून महार
भीमा व्याकुळ तहानेनं
वते पाण्याची वर्तुनी धार
दुःख जातीचं ते गहन रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
ज्ञान घेत होता पुस्तकी
जातीभेदाची ठणक मस्तकी
ओठी शब्द इंगळापरि
भेदली तयानं गावरावकी
अधर्मारोधी गेली जबान रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
प्रज्ञेसाठी सोडे माय देश बाप
प्रयाण केले परदेशात
बहुजनांची काळजा हाक
खाऊनी पण राहुनी नेक
दहात एक भीम विश्वात
सल जातीपातीची उरी
जणू इखारी सूरी
घाव घाली जिव्हारी
इडा उचलोनी भीम
घेई सारं शिक्षण
मुक्तावे अज्ञानी जनतेनं रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
शिकून ब्यारिस्टर झाले 
परत मूळभूमीशी आले
बडोद्या संस्थांनी नोकरी
क्रूर सनातन्या पाहिले
उष्टा तांब्या माठ बाटला
जिव्हारी पाणीथेंब आटला
असेल शिकून गत आसी
माझ्या समाजाची रोज
रात जात असेल कशी 
पाहुनी आले भीमाला भान रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी
काय केलं मांगाहारानं
मिळे वागणूक दुय्यम
म्हणुनी कयास हा अधम
घेई शपथ तिथे भीम
आहे सारे सर्वासम
ना कोणी थोर सहान
खरी मानवता महान
शिकूनी सारे संघटित व्हा
द्यावा लढा संघर्षानं रं
गातो भिमाचे गुणगाणं रं
                             जिरं हा जिरं जी

..................................................................................
"मलं वळख हाय म्या मानूस हाय....!"

"जात्यांध अजियांचा मी संग काटला
विश्वात सत मानुस्की अंग थाटला.....!"

"जातीत मोजणारी "ती"कडे जात होती
मातीत बुजणारी "जी" गडे नेत होती...!"

"जातीत तोलणारी ना"ती" नकोच....!

तिलं म्हंन्लो...
"मानुस्की महा धर्म म्या माणूस हाय
जग्ने अस्सं हाये मर्ने तस्सं हाय.!

"जा तिच्या कुंपनालं तोडा तोडा हो
जीव घुटमळत हाय थोडा थोडा हो..!

"जात जात तीच बोलली
धर्मांध बात तीनं खोलली...!

"मानिले माणूस मी जेव्हा
धर्म गांडूळे बोलू लागला...!

"मलं वळख हाय म्या मानूस हाय....!"



.................................................................


"भल्या सुरेबिना झाली जागी मुंबै गर्दी रे तुंबळ
कार्खाने,भट्टया,घरघर इथ्थल्ली गर्मी रे बंबाळं...!



तू का म्हणतो मागे वळून पहावे
सज्जनांचे घर आता कुठे शोधावे!
........................................................
*दगडझुक्यांनो.......!***

"विश्वात्ला कोंत्ताच दगड ह्यो सजीवंत नस्ल्यानं सजीवाय्ची दुःखं,वरड,सुखं,क्लांत,दाह त्यो उम्गु शकत नाही...!"



           एकीसाठी हाय हाक झिजवुनी टाक रे
अन्यायाचे नेकीने फिरवुनी चाक रे

मघा ठिणगीने चिता पेटून गेली
हो ती केव्हाची चिंता मिटून गेली


तू शब्द ओठांवरती आणू नको
बोलणे फारसे जमणार नाही
काळजात काहीही अर्थ लावू नको
भावनांना सारखे जपणे जमणार नाही


बहरातल्या पानगळीची अनुभवून ठाव घे
हे उन्हाळ्या बरसादीचे समजून तू गाव घे

बा तुम्हां शब्दांवर
आलो इथवर

खंव्दाळल्या वेदनेची लहर अजून हाय
जीव लाविला ज्याला तोचि का डसलाय

बा दिल्या त्या शब्दाने हुंकारतो आजउद्याही
जखमेच्या खिपल्या कुर्वाळणे सोडतो आहे

ज्या लेखणीने सत्य सारा विश्व चालतो आहे
आज खरा विश्वातला माणूस बोलतो आहे...!"

झरझर सोड पाझर तुझ्या आतला भुमे
                  न।         सूर्य मातला भुमे






दर्द होता है क्या तुझे पता नहीं
दर्द देनेवाले दर्द दर्दी से पुछं लो
अक्सर हालात होते है क्या हालाकी
दर्दनाक मक्सदवालो से पुछं लो



सोड घाटमाथ्या कोर्डा दुकाल
डोळयांत धारतीर्थ अभंग ठेव

घोर घाटमाथ्या कोर्डा दुःक्काल
होतो धारातीर्थ डोळ्यांनी पोशिंदा

घाटमाथ्या खंगाळ कोर्डा दुष्काळ
पोशिंद्याच्या डोळ धारतीर्थ सुकाळ


पोशिंद्याच्या डोळा धारातीर्थ कोरते


अशनिपात केला तू काळजावरी
जणू कोरले लोणार जमिनिपरी

अशनिपात घडविला काळजावरी
जणू फोडले लोणार जमिनिपरी
               
उरा घुसवून सुऱ्याने का चिर केली
दुभंगून जमीन इथली नाईल झाली



अशनीतोड केला काळाजातूनी
जणू कोरते वेरुळ अजिंठा लेणी

उल्कापात केला असा तू
जणू लोणार मी झालो



फेकतो लाव्हा आतला
भूकंप होण्या आधी हो





रीत पाळणे कधी जमले नाही
मुक्ततेला टाळणे जमलें नाही......

अरे करशील जेव्हा जेव्हा रीत तू
मोडायला तेव्हा तेव्हा मी नित आहे...

घे सत्य हे विश्व तुझे नित सोबती आज आहे
तमा न ठेव कशाची मुक्ततेचे राज गीत आहे.....


बोल ते जरा खोटे खोटे
किंतु लपव ते खरे खरे

सांगणे चुकीचे चुकीचे
लपविणे खरे खरे 

सांग तू ग् खोटे खोटे
लपवित खरे खरे

सांगणे जर चुकीचे
लपविणे किती खरे



आशिक हुवा मन मासुक क्या दूर है
दिल मे बसा दिलदार तो चस्मो क्या नूर है



Comments

Popular posts from this blog