"नेमाडेंच्या लेखणीतला शुक्राणू"
"रंगमंच्याच्या गर्भार गोटातून नेमाडेंच्या लेखणीतला शुक्राणू वळवळत मेंदूत घुसला पांडुरंग सांगवीकर होऊन.सुन्न झालेला बुळबुळीत मेंदू सांगवीकराने चेंदून टाकला देखणी सोबत." "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र आयोजित ललितोत्सव दोन दिवसांपासून नामदेव सभागृहात सुरु आहे.काल "कंनुप्रिया" या हिंदी काव्यखंडावर प्रयोग झाला.आज नेमाडेंड्या " मी पांडुरंग संगवीकर"आणि "देखणी" या साहित्यावर प्रयोग झाला.दोन्ही दिवसाचे प्रयोग मेंदू चेंदून गेले.ठसा उमटला त्यो नेमाडेंड्या साहित्याचा.बोराडीला अध्यापकीय प्रशिक्षण घेत असतांना हूल,देखणी,कोसला,बिढार,तुकाराम,वाचलं.तर पुण्यात आल्यावर नेमाडे अख्खे भेटले वाचायला.पुण्यात झुल,जरीला, मेलडी हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ भावून गेलं."रंगमंच्यावरचा सांगवीकर पहायला हवा....!"असं कोणतरी चार वर्षापूर्वी म्हणल्याचं आठवतंय.ते आज पूर्ण झालं.पांडुरंगाच्या अन देखणीच्या मध्यात निर्धोक उभे ठाकलेले "भालचंद्रजी नेमाडे" नि त्यांच्या लेखणीतील "शुक्राणू"मेंदूची अस्तरं फाडत गेला.आत्मचरित्रापासून सुरुवतीचा अंत करणारी "देखणी" पांडुरंगाचं अस्तित्व उभी करत गेली.रंगमंच्यावरील एकेक पात्र अस्तित्वाचे नाते जोडत होतं.देखणीतल्या द्रव्याची हवा काळजाच्या श्वासात गुदमरत होती प्रेक्षकांच्या.मी आपलं गुढग्याला मुंडकं लावून न्याहळत होतो दृश्य काळ्या पडद्यापुढचे. सांगवीत रांगलेला पांडुरंग खांदेशाचे बालपण रंगवीत होता.रंगमंच हादरून गेलं सतराव्या वर्षी खांदा दिल्यावर. फर्ग्युसनचे ते पांढऱ्या पायजम्यातले वस्तीगृहातले दिवस अन ती वेताळ टेकडी सारं काही बोलत होती. सांगवीकर जेव्हा मुंबईत आले तेव्हा उपासमारीच्या दिवसानं खंगुन जाऊ लागली आमची मनं. सभागृहाच्या अंधारात.मुकाट तोंड आ वासून पाहू लागलो.पुढं पांडुरंग नगर ला गेला.विणापावसाचा सालगिराह करणारा पांडुरंग धुळ्यात आल्यावर अंधारात गडप झाला.पडदा पडला.पुन्हा विजेऱ्या चकाकल्या प्रकाश सारा.वेरूळ ,लेण्या अजिंठ्या दाखविणारा पांडुरंग सांगवीकर.वंशविस्तारात अडकला औरंगाबादेत नजरेस पडला.अन लंडनला जाऊन पुन्हा परतला.भांडण झाली.पावेलची राज्यव्यवस्था त्याला पचली नाही.आहे तसाच भारतभू आला.जगला.स्वाभिमानाच्या दिपस्तंभासारखं.मराठवाड्यातलं जिणं अन विद्यापीठात असणं.शेळ्यामांघं पळावे तसे.मराठवाड्यातून पुन्हा गोव्याला किनारीवर.तिथला अनुभव.इकडं मनुचं दुःख. देवीच्या आजारात किडलेली मनी प्रेक्षकांच्या अंगावर उठवत होती फोडं.घुमत होते सारे सभागृहात प्रेक्षक जिवंत जाणिवेनं. इतिहास जगल्या वास्तवाचे.त्यातूनच उमटणारी अन स्त्रीदुःखावर फोडलेली आक्रंदणे मस्तकात तिडीक उठवीत होते.उतरंडी व्यवस्थेच्या हातोड्याने आंड ठेस्लेला अन जगतांना जित्त्या माणसाचा झालेला बैल कसायाच्या पिढ्यावर कटत होता.कत्तलखान्यातला अनुभव जिवंत होत होता.लांब होणारे रस्ते नि जीवनवाटा देखणी बोलत होती,"नाही बदलत कधीच."पिढ्यांपिढ्याचा देखणीसोबत आलेला काळ ओघळत होता .अधूनमधून देखणीतल्या सुरेल मार्मिकतेच्या दुखऱ्या खाचा फोडणाऱ्या आरोळ्या कानात शिसं ओतत होत्या.रशिकवर्ग काळजातून चर्रर्रर्रर्रर्र....... समाजातल्या वास्तवाचा वारू होऊन वादळ स्थिरावलं मुंबईत गोव्यातून पिकलेलं.देशीवादाचं काहूर माजल्यावर संस्कृतीला कडाडून चावलंय नेमाड्यांचा लेखणीच्या जंतर दातानं. म्हतारीचा उसासा करणारा आठवांचा लोळघोळ कंठाच्या उत्कंठा चुर्गाळंत जाऊ लागला.आजी जुनाटपण घेऊन येत होती नवी दिशेचे धुमारे फोडत हृदयावर.पांडुरंग संगवीकराने नि देखणीने मर्म ठेवलंय तरण्या रक्तात नव्या उमेदीने.आता त्या सळसळत्या उसंड्या घेऊन रातभर मेंदू असलेलं मुंडकं मारतंय उड्या वास्तवावर....… विश्वाचं.... |
"गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" गावाकडून बातमी कळली, अन क्षणार्धात डोक्यात विचार तरळले की, "गाव इतकं कसं बेईमान व्हईल?" "पंचक्रोशीतील जगणारांच्या जाणिवांचा अन माणुसकीचा खात्मा झाला क्काय?" "निदान गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" "गावातल्या बुजुर्ग लोकांना तरी कळवळा यायलं पाह्यजे होती." "का गावाला हे सगळं माहिती नव्हतं?" "गावातलाच माणूस होता नं त्यो का परका होता?" पंचक्रोशीतील जनतेच्या आडल्यानडल्या वक्ताला उपेगी पडणारा माणूस होता ब्वॉ त्यो. वरीसभर कामात जुपलेला. पेरणीपसून तर विकणीपर्यंत उपेगी पडणारा हरहुन्नरी कारागीर होता त्यो. तरबेजी कास्तकार. मापगुण्याला प्यारा असणारा अन - "सगळं काम नीट व्यवस्थित झालं पाह्यजे ब्वॉ!" असं म्हणणारा त्यो सुतार होता. दोरीसुतात काम उभं करणारा मिस्त्री होता त्यो. ...
Comments
Post a Comment