★★★"भुकेवर जॅकेट्स चढवता येत नसतात!"★★★
"का करे बाबूजी...यह पेट का मामला है!"
"भूख की गड्डी कहां-कहां नहीं घूमाती...?"
"पेट की भूख के पीछे पीछे घूमना पड़ता है...?"
हे जगण्यासाठी धडपडणार्या जाकेट विकणाऱ्या पवनसिंगचे बोल आहेत.
दिवाळी महोत्सवानिमित्त पुण्यात वस्तूंची खरेदी-विक्री जोमात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून विक्रेते आपल्या वस्तू घेऊन बाजारपेठेत येतात.यात महाराष्ट्र्रातून हातवस्तू बनविणारे तर असतातच परंतु राज्याबाहेरील व्यापारी,विक्री करणारे भुसारी,दुकानदार आणि पोट भरण्यासाठी एखादा व्यवसाय करणारेही येतात.शहर त्यांना पोटात घेतं का ते शहराला हा मूळ प्रश्न?
यावर्षी कानपूरमधील नादेमऊ गावचा पवनसिंग नायक हा आपले पोट भरण्यासाठी पुण्यातल्या मंडई भागात येऊन दाखल झाला आहे.मूळचा पवनसिंग उत्तर प्रदेशचा.पण व्यवसाय करत करत भाकरीच्या शोधात शहरात येऊन जॅकेट्स विकू लागला आहे.यामागे त्याचा मोठा संघर्ष आहे.तो म्हणतो,
"हमने गांव छोड़ा इक बरस हो गया!"
"मां बहन भाई की याद आती है!"
"पर क्या करूं वापस नहीं जा सकता!"
"पेट का मामला परा आखिरकार!"
"दो-तीन महीने के बाद पैसे का इंतजाम करके घर गांव को बैंक से भेज देता हूं!"
"घर में मां,दो बहने और चार भाई है!"
"जो मेरे से छोटे छोटे हैं। उनकी जिम्मेदारी मेरे सिरें है।" "क्योंकि बिमारी की वजह जल्दी ही मेरे पिताजी को मौतने बुलाया!"
"छोटी-बड़ी खेती-बाड़ी भी नहीं....!"
"का करू बाबूजी भूख की गड्डी कहा कहा नहीं घूमाती...?"
"पर जाते हैं। घूमते हैं। हार नहीं मानते।जीना तो पड़ेगा!" "कुछ भी हालात हो; मर नहीं सकते जब तक मृत्यु नहीं आती!"
अशी जबर हिम्मतवाणी त्या स्थलांतरित झाल्या परदेशीच्या जबानीत आह.भयंकर संघर्षातून तो जीवन आणि मृत्यूचा अंतरातील खेळ जीवनासोबत खेळत आहे.
जॅकेट्स विकताना तो समजूतदारपणे म्हणतो, "ग्राहक हा भाकरदाता असतो.म्हणून त्याच्या सोबत,
"अदब से पेश आना पड़ता है..."
अशी तो व्यवसायी बोली बोलतो.नाही तर ते त्याचं मतच झालं आहे.या प्रवासात आजारी पडलो तर आमची "खैर" नाही.आणि अशावेळी "आमची दिवाळीच वाजते" असेही तो मिश्किलपणे बोलता-बोलता म्हणतो.मराठीत मराठीतले काही शब्द तो समजू शकतो, उच्चारतो.पवनसिंग आत्तापर्यंत बंगाल,मध्य प्रदेशातील सतना,रीवा,राजस्थानमधील किशनगढ़,गुजरात,महाराष्ट्र, भोपाळ,बिहार,रांची,सिमराई,उत्तर प्रदेश अशी पोटापायी प्रदक्षिणा करत-करत आला आहे.
जगण्याची उमेद जिगरबाज आहे त्याचा वास्तवाशी घनघोर संघर्ष सुरू आहे.आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तो शिकलेला नाही.पोट भरण्यापोटी शिक्षण झालं नाही.या जॅकेट्सच्या संदर्भात माहिती देताना तो म्हणाला,
" ₹180 को हम इसको खरीद लेते हैं!"
"और ₹200,₹220,₹250 मैं बिक डालते हैं!"
"ग्राहक जैसे हो वैसे कीमत लगाते हैं!"
"और दुकानदार,व्यापारी,कवि,लेखक और छोटे-बड़े नेतागिरी करनेवाले यह जैकेट,या फोटो शूट करने वाले लोग खरीद ले जाते हैं!"
"मोदी और बास्केट,बासकोट यह जैकेट बहुत खरीदते हैं!"
"दिनभर कमाई हुई तो रात को खाना अच्छा लगता!"
"नहीं तो घास भी कड़वा लगता है!"
"यहां कुछ मवाली,कोई दादागिरी करने वाले लोग भी दुकान को लगावा नहीं देत है!"
"दुकान ही क्या जी जो दो थैला-बिग!"
"या फिर जाने जाते हैं अपने कंधे पर उठाकर!"
"और दूसरी जगह पर रखते हैं!"
"हफ्तों में पुलिस की गाड़ी नहीं आएगी यह सुनकर अच्छा हुआ। लोग कह रहे हैं कि,अब वह पुलिस बार बार उठा नहीं देगी। कुछ दिन के लिए शांतता तो है। रहेंगे और दिवाली खत्म होने के बाद जाएंगे बंबई!"
"भूख के उपर तो नहीं चढा कर सकते यह जॅकेट्स...? खाली हलचल पेट के लिये करनी पड़ती है-यही तो जिंदगी है!"
दिवाळीसाठी "गरम खिसा" खाली करु अशी मानसिकता जपून असलेले एसीतले काचेच्या बाहेर पडलेत.ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छाता आहे.पण ते भाव कमी व्हावा म्हणून घासाघीस करत आहेत.तो भर उन्हात उभा आहे.
"त्याची उमेद पडत नाही खाली तो जोपर्यंत मरत नाही...
भाकरी मिळते कष्टापुढे कुठेही जगणे तोवर संपत नाही...!"
नेमकाच त्यानं अन म्या वडापाव खाल्लाय.दिवस मावळल्यावर त्याला भूक लागंल... आजची दुपार टळून गेली.दिवाळी साजरी करणारे मोठ्ठ्या आनंदात तरळत आहेत.जणू बख्खळ पाण्यातले बेंडकं...
देशाचा विकास महाराष्ट्राच्या दुष्काळात करपतोय.
काळ पुढं झपाट्यानं पळत आहे.
अजूनही पवनसिंगचा भाकरीसाठी लढा सुरूच आहे. खांद्यावर ओझे घेऊन.
#वंचितांच्या दिवाळीचे काळज मांडतांना...
.............................................................................

Comments

Popular posts from this blog