क्रांतिसूर्य लहुजी(वस्ताद) राघोजी साळवे(राऊत)
जन्म १४ नोव्हेंबर १७९४-पेठ,पुरंदर गड,पुणे
मृत्यू :१७ फेब्रुवारी १८८१-संगमपूर,पुणे
क्रांतिसूर्य लहुजी (वस्ताद) राघोजी साळवे यांचा जन्म पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठया गावी झाला.त्यांना लहुजीबुवा मांग असे उल्लेखले जात होते.लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत.हे घराणे शिकरखान्याच्या प्रमुख पदावर होते.त्यामुळे शिवाजीने आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या.त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊतया पदवीने गौरविले होते.पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले.१२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवें यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला.राघोजी साळवे या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले.१७नोव्हेंबर१८१७ला पुणे हे ब्रिटिशांनी काबीज केले. पेशव्यांचा पराभव झाला.पुढे इ.स. १८१८मध्ये भगवा झेंडा शनिवारवाड्यावरून काढून तेथे इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला.या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली.स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले.भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठीअशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांचे थडगे उभारले.ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या वाकडेवाडीयेथे आहे.आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला.पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारकनिर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले दांडपट्टा चालविणे,किल्ल्यावर पाठीच्या साहाय्याने चढणे,तलवार चालविणे,कट्यार,जम्ब्या खुपसने,भालाफेक करणे,घोड्यावरून रपेट व शिकारीचे मुंडके फोडणे,गल्लोरीने शत्रूवर निशाण साधने,एका दगडाने दोन बाजूच्या शत्रूला घायाळ करणे,दोरखंडाने भिंती,गड,कोट,किल्ले,भुयार आणि मढ्या चढणे.विहिरी,खंदक,खोलयुक्त भुयार,दर्या, भुईमार्ग उतरून चढाई करणे,हिंस्त्र प्राण्यांच्या शिकारीचे कसब शिकून ते या युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८२२ मध्ये रास्ता पेठ,पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध आखाडा म्हणजे कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले.यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,वासुदेव बळवंत फडके,महात्मा जोतिबा फुले,गोपाळ गणेश आगरकर,चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे,क्रांतिवीर नाना दरबारे,रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे,नाना मोरोजी,क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर,क्रांतिवीर नाना छत्रे,उमाजी नाईक,स्वतः महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकायला येऊ लागले.म्हणून लहुजींना वस्ताद असेही उल्लेखित केल्या जाते.महार मांग हे तर या रक्ताचे संघशील तत्व होय.ते या सर्वनिपुन कलेत वरील शिष्यांचे गुरू होते.आखड्याजवळच त्यांनी एक विहीर खोदली.आणि ती विहीर सर्वांसाठी खुली केली.सर्व जाती धर्माचे जन तिथे पाणी प्राशन करू लागले.ही एक समाज एकजुटीची क्रांती होती.या कार्याने महात्मा फुले प्रेरित झाले.१८४७चाही अगोदरपासून महात्मा फुले या आखाड्यात जात होते.लहुजींना ते गुरू मानत होते.पुढे
महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडे वाड्यात सुरू केली हा काळ जातीय मक्तेदारवर्गाने फुलेंवर आणि सावित्रीबाईंवर गु-घाण फेकण्याचा हा काळ होता.जीवे मारण्याच्या धमक्या-मारेकरी आणि प्रत्यक्ष दगडांचे घाव टाकण्याचा हा काळ होता.या काळात सावित्रीबाई फुले ह्या निर्धास्तपणे शाळेत ये-जा करायच्या कारण त्यांना लहुजी वस्ताद साळवे यांची अगरक्षकांची जबाबदारी होती.महात्मा फुलेंना अंगरक्षक म्हणून पुढे लहुजी कैकदा त्यांच्यासोबत होते.१८४८ह्या वर्षात खूप क्रांतिकारक बदल समाजात झाला.ज्या धर्माने मुलींना,बहुजनांना,अस्पृश्यांना आणि दलितांना शिकायला,शिक्षण घेण्याला बंधन लादली होती.ती बंधने झुगारून फुले दाम्पत्याने पहिली भारतातील शाळा निर्माण केली.आणि त्यांनी या पिळलेल्या, पिचलेल्या,दळल्या गेल्या समाजाला,गुलाम म्हजून वागवल्या वर्गास शिकवायला सुरुवात केली.प्रथमच लहहुजींच्या आखाड्यात ही शाळा भरू लागली. अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षण यावर करार झाला समाजहितासाठी.१८५१मध्ये ज्या दोन शाळा होत्या त्यात लहुजींच्या आखाड्यात काम करणारे दोन शिष्य होते.एक पाढे पाठ करून घेणारा-गणू शिवजी तर दुसरा धुराजी आप्पाजी हा बाराखडी घ्यायचा.ब्रिटिश शिक्षण खात्याने अस्पृश्यता शिक्षणाच्या कार्यासाठी महात्मा फुलेंचा सत्कार केला.तेव्हा लहुजी वस्ताद त्या कार्यक्रमात हजर होते.कारण याचवर्षी 'कम्युनिस्ट मैनीफेस्टो' जाहीर झाला होता.१२जून १८५३पर्यंत कैक शाळा सुरू झाल्या.कारण लहुजी स्वतः अशिक्षित होते परंतु ते मांग-महारवाड्यात जाऊन गोरगरिबांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी विनवणी करू लागले.जमवू लागले.या कामात राणोजी महार त्यांना मदत करी."शिकले तर संघर्ष कळेल.गुलाम म्हणून किती दिवस जगायचं?बाप गुलामीत मेला,पोरांनो तुम्ही तरी जग मुक्त बघा."१०सप्टेंबर१८५३ 'द सोसायटी फॉर प्रोमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार-मांग इटीसी' या संस्थेची स्थापना करण्यात आली.त्यात लहुजींच्या कार्याची महत्वाची पावती मिळते.कारण लहुजींचे मोठे बंधू शिवजी साळवे यांची मुलगी 'मुक्ता' लहुजींची पुतणी या शाळेत शिकायला म्हणून पहिली विद्यार्थी होती.मुक्ताने शिकलेल्या ज्ञानातून "मांगामहारांचे दुःखाश्रु" हा संशोधन असणारा अहवाल निबंध लिहिला.आणि ब्रिटिश सरकारकडे तो फुलेंनी इंग्लंडमध्ये राणीकडे पाठविला.या संशोधन अहवाल निबंधाला अनुसरून पुढील ब्रिटिश धोरण अस्पृतेविषयी ठरू लागले.आणि मुक्ता यातुन अजरामर झाली.कोवळ्या वयातील मुलीने अस्पृतेविषयी लिहिणे म्हणजे एक क्रांति होती.कारण हा काळ मुलींना घरात बसून स्वयंपाक,भांडीकुंडी, दळणभर्डन,आणि रांगोळ्या काढणे नाही तर बाळूते धुवायला लावणारा होता.घराच्या उंबऱ्यावर्ती पाऊल न ठेवू देणाऱ्या व्यवस्थेचा होता.मुली ह्या चुलीपुरत्या होत्या.स्त्री ही वासना भोगण्याची बाहुली होती.पण लहुजींना व फुले दाम्पत्याने ते सर्व रुढीप्रिय वास्तव अमान्य होतं.ते स्त्री,शूद्राती शूद्र राजकारण त्यांनी एकजुटीने झुगारून दिलं.तो काळ कट्टरपंथी होता.
१८२६पासून हा इंग्रज लढा सुरू होता.पुढे इंग्रज-रामोशी यांच्या बंडात लहुजींनी बंडाचे नैतृत्व करण्यासाठी उमाजीला नायक केलं.उमाजी नाईक हे त्या बंडाचे खलितेदार झाले.१८५७ च्या उठवत कैक शिष्य लहुजींनी पाठविले.शस्त्रसाठा व खानावळीची मदत केली.बहादूर शिष्य त्यांनी तयार करून पाठवून दिले.
१८५८ हा काळ पुन्हा रणसंग्रामात निपजणारा आहे.त्याकाळात लहुजींच्या आखाड्यात पिळदार देहयष्टी असणारे तरुण तडफदार पैलवान गडी तयार होऊ लागले.ते एक क्रांतिकारी विद्यापीठ होते.या रणसंग्रामात लहुजींच्या शिष्यांनी फार शिस्त व करारी भूमिका घेतली होती.आजन्म अविवाहित असणे हे लहुजींच्या ध्येयवादी दृष्टीचे लक्षण.म्हणून त्यांना 'सशस्त्र आद्यक्रांतिकारक जनक' 'सशस्त्र क्रांतीचे पहिले गुरू' म्हणतात.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना देवरनावडगामुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला.७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला.अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.
"एकोणिसावे शतक प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नव्या जाणिवा पेरण्याचे होते.पण समाजाच्या जडणघडणीसाठी पायाभूत ठरलेल्या महापुरुषांचा लिखित इतिहासच आपल्याकडे उपलब्ध नाही.त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची आज समाजाला फारशी माहिती नाही.लहुजींचे चरित्र लिहिले गेले पाहिजे. त्यासाठी लहुजींच्या गावी पुरंदर भागात पायपीट करावी लागेल.तेथील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधून लहुजींच्या आठवणी मिळवाव्या लागतील.हे अवघड काम आहे, पण ते करायला हवे.’’
टीप-दरवर्षी १८ नोव्हेंबर लहुजी जयंती साजरी होते.या दुर्लक्षित वास्तवाकडे(स्मारक) ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून पाहणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog