***लेखकत्व***
लेखकत्व ही स्वत:च एक अत्यंत जबाबदार नैतिकता आहे. माणसांच्या दुनियेत, एकमेकांना ओरबाडणाऱ्या तृष्णांध दुनियेत लेखकाचं स्थान काय असतं? केवळ सर्वच सत्तास्थानांपासून दूर राहणाराच नव्हे, तर सर्वच सत्तास्थानांची कठोर चिकित्सा करणारा आणि स्वत:ला अप्रिय करून घेणारा वा स्वत:ला अडचणीत आणणारा हा लेखक कशासाठी लिहितो? माणसांच्या या अस्तित्वसृष्टीत त्याचं स्थान काय? समाजाच्या एकूणच मूल्यव्यवस्थेशी, तिच्यातील संघर्षाशी त्याचं नातं काय असतं? लेखकत्व हे स्वत:च एक पराकोटीचं गांभीर्य असतं. लेखक स्वत:च एक सर्वहितैषी संविधान असतो. तो सर्वांच्याच एका कल्याणबिंदूवर उभा असतो. तो स्वत:साठी लिहीत नाही. तो सकळांसाठी लिहितो. तो सकळांच्या हिताचा सौंदर्यशब्द लिहितो. असं सर्वांसाठी लिहिणं हेच त्याचं स्वत:साठी लिहिणं असतं. सकलार्थ हाच त्याचा स्वार्थ असतो. तो त्याचे शब्द वापरतो, पण त्या शब्दांत दुनियेचा अर्थ असतो. तो त्याला आकलन झालेला अर्थ मांडतो, पण या अर्थात विश्वाचा मर्मार्थ असतो. लेखकांच्या साहित्यकृतीतून भाषा बोलते. ही भाषा तीन पातळ्यांवरची असते. ती शब्दकोशातली भाषा असते. अजून शब्दकोशात भरती झाली नाही अशी सतत नवनव्याने निर्माण होत राहणारी व्यवहारातली भाषा असते. या भाषेलाच जोडून साहित्य व्यवहारातलीही भाषा असते आणि अशा सर्व भाषांची मुद्दल लेखक वापरतोच; पण गरज पडते तेव्हा तेव्हा तो स्वत:चीही भाषा निर्माण करतो आणि मुद्दलावरचंच व्याज वापरावं, त्याप्रमाणे हे भाषेवरचं व्याजही तो वापरतो.
(एक विचार)

***ज्ञानरचनावादाकडे***
वर्तनवादाची चिकित्सा करतांना ज्ञानरचनावादाची पार्श्वभूमी लक्षात
घयावी लागते.यातूनच नव्या ज्ञानार्जनाच्या पायरीकडे वाटचाल होत असते.शिक्षण
पद्धतीकडेही बघण्याची, नव्याने विचार करण्याची दृष्टी यायला
लागते.खरे तर प्रत्येकाकडे मुळात कुतूहल,चौकसपणाची व नविन
गोष्टी आत्मसात करण्याची उर्मी असते.मात्र वर्तनवादी पद्धतीत आपण ज्ञानाचे बंदिस्त
असे रचनेत रूपांतरण करीत असतो.आणि वास्तवात ती उर्मी दाबून टाकत असतो.वास्तविक
पाहता आपला परिसर,आपली नैसर्गिक रचना,सहचर,भाषा या सर्वांतून एखाद्या झाडाने जीवनरस मिळवावा,तसे
मुलं शिकत असतात. ते स्वतःच कल्पनाशक्तीचा वापर करण्यास उत्सुक असते.मात्र त्याच
पद्धतीचा किती वापर करावा याचे ताळतंत्र त्याकडे नसते.योग्य उपयोग करून त्याचा
शिक्षण पद्धतीला बळकटी करण्यास केला तर तो सहोपोयोगीच ठरणार असतो.शिक्षण हि "शिकविण्यापेक्षा
-शिकण्याची"प्रक्रिया बनते.म्हणजेच कळ्यापासून फुले हि उमलावी असे ते धोरण
असावे.विश्वनाथ साठे
Comments
Post a Comment