***मानवता***
" माणूस समूहाने राहतो.ती त्याची गरज आहे.जगणे हि एकांतिक बाब नाही.तिला आदर-आधार हे पैलू आहेत.म्हणूनच वर्चस्ववाद, वर्गवाद,अधिकारत्व,हुकुमशाहीवादी,सत्तेच्या आहारी पडून डामडौलवाद व वंशवाद,अधर्मशाही,अविचारी व नीतिमत्तेच्या तोंडी कोलीत लावणारी विचारसरणी या समूहाच्या अंगी भिनली जाते.मानवी समाजात एक प्रकारची विषमता येत जाते.मग ती जातीय,धर्मीय,पंथीय,वैचारिक,लिंगभेदीय, आर्थिक,नैतिकतेतून विषमतेची जहरी पिशवी हि त्या त्या मानवी समूहात पेरली जाते.ती विचारसरणीतून उतरते अधोगतीच्या सुळदार दातात.हि दात उपटण्यासाठी विवेकवादी सांडस फार मोलाचे काम करीत असते.सर्व भ्रामक कल्पनांचे व वेदनबीज उखडून टाकते.
समतेचे तत्व जोपासणारी लेखनशैली या समूहाचे विचारतत्व व जीवनतत्व परिवर्तित करणारी असते.भेदभाव नष्ट् झाला पाहिजे असा पवित्रा घेणारे विचार समृद्धता व स्वातंत्र्याचे पाईक असतात.ते लेखणीतून उतरवणे आज काळाची गरज आहे.यातूनच नव्या मानवतेचा जन्म घातला जातो.ती मानवता शिकविते पराधीन जगण्याची शोकांतिका हद्दपार करण्याची तंत्रे आणि कौशल्य.नव्हे तर ती गुलामगिरी तोडण्याची व जुलमी राज्यसत्ता उलटण्याची हिम्मत देते.अनिष्ठ रूढी व परंपरेचे अणि आज्ञांचाचे सांगाडे फोडणारी धमक त्यात उतरवली जाते.स्वतंत्र,आत्मनिर्भर,प्रज्ञानी आणि स्वाभिमान या सत्याने घेऊन जाणाऱ्या पायवाटेवर हि मानवतेला नेणारी शास्वती मूल्य आहेत.ती मानवता खरी की जी मानवता आहे त्यात तिळमात्र शंकेने असत्य नाही. कारण;"सत्य लपू शकत नाही.तर बनावटही होऊ शकत नाही.असत्य हे नकली आणि आखूड च्याद्रितील मर्म असते.हे सत्य....!"

Comments
Post a Comment