"आपण बाबासाहेबांना अभिप्रेत  असलेले बौद्ध झालो आहोत का..?"
वास्तवे तर 14,15,16,17,18ह्या 22 प्रतिज्ञा पैकी या 5 प्रतिज्ञावर आजचा धम्मजनसमूह व बाबासाहेबांचे विचार यांचा अभ्यास सखोल चर्चेस घेणार आहे
प्रतिज्ञा क्र. १४:-  मी चोरी करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १५:-  मी व्याभिचार करणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १६:-  मी खोटे बोलणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १७:-  मी दारू पिणार नाही.
प्रतिज्ञा क्र. १८:-  ज्ञान (प्रज्ञा)शीलकरुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
                            खरे तर 22 प्रतिज्ञेपैकी ह्या दैनंदिन जीवनात अनुसारण्याच्या प्रतिज्ञा आहे असं मी ठामपणे सांगतो.काही कालपरत्वे मागे पडल्या आहेत.त्याचा संदर्भ म्हणजे 1956ला नाग तीरी आपल्याला धम्माची दीक्षा मिळाली.आणि तेव्हापासून उर्वरित 17 प्रतिज्ञा पाळीत आलो आहोत. म्हणजे त्याकाळी साहेबांनी आपल्याला ते तत्वज्ञान अंगिकारायला सांगितले होते.ते आम्ही बुद्धीच्या कसोटीवर घासत आलो आहोत.आणि सत्यासत्य आचरणात घेऊन जीवन जगातही आहोत.कारण आम्ही दीक्षेपूर्वी हिंदू होतो.बाबासाहेबांनी ती हिंदू धर्मात होणारी आमची लाचाईची जिण्घाई साहिली होती.बडोद्याचे उष्टा तांब्याचे प्रकरण सर्वांना माहिती आहेच.यथोचित साहेबांनी ती काळाराम मंदिराची चळवळ,नासिक तसेच चवदार तळे माणुसकीचे फुलवून मळे हे तत्व तर महान कार्याची संहिता इतिहासाच्या पानोपानी शाबूत आहे.म्हणून ती आरोळी ठोकली होती साहेबांनी कि,"जरी मी हिंदू धर्मात जन्मास आलो,तरी मी त्या हिंदू धर्मात मरणार नाही...!"ज्या धर्मात आम्हांला जगण्यासाठी कोनाकोणाची पाय धरावे लागतात,ज्या धर्मात आंम्हाला हीं वागणूक मिळते,गावगाड्यापोटी कुजलेल्या कुत्र्याचे मेले शरीर वेशीदुरास्त फेकण्यासारखे घाण काम करावे लागते,माणूस म्हणून आम्हांला माणुसकीची वागणूक मिळत नाही,जातीच्या कटुऱ्यात उपेक्षेची भीकेला ढीग येतो.त्या द
धर्माचे आम्ही का म्हणून पाईकत्व स्वीकारावे??             
                                     जी माणुसकी माणसाला माणुसकीचे वर्तन शिकविते त्याचा अंतर्भाव ज्या धर्मात आहे तो आमचा धर्म.आणि ती माणुसकी गौतम बुद्धांनी कैक हजारो वर्षांपूर्वी अनुसरली होती.तिचा प्रसार-प्रचार केला होता.त्यात होते अहिंसा,प्रेम,सदाचार,विवेक. मुद्दा असा आहे की या विचारसरणीने वागणारी किती जनता स्वतःस धम्मपुत्र म्हणूवून घेण्याची तयारी उरात ठेवते..?किती जनता आज दिवसभरात खोटं न बोलण्याचा प्रयत्न करते?किती जनता व्यभिचाराचा खात्मा करण्यासाठी स्वतः व्यभिचार करण्या धजन्यास नाकारते ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दारूचे व्यसन नसणे हे सद्गुणी चे लक्षण आहे असे म्हणणारे किती तरुण आहेत..?दारू हा विषयच कमी त्याहीपुढे अमली पदार्थ सेवन करण्यात तरुणाई झिंगत आहे. हयातीत साहेब म्हटले नाही की, मिरवणूक  करतांना मोठ्या आवाजातील डीजे लावले पाहिजे.सर्वांग चिखलात भरून जाईल असे कसे तरी नाचून आनंद व्यक्त केला पाहिजे,असे म्हणणे होते का साहेबांचे..?हा पडलेला प्रश्न आहे.त्यातल्या त्यात पावशेर पिऊन सव्वाशेर होणारी कळत नाही असल्या वयापासून तर दात पडल्या वयाच्या पर्यंत झिंगाट झालेली मंडळी जयंती,बुद्धपोर्णिमेस पाहावयास मिळते.ती फक्त धम्म स्वीकारलेली जनता नसते तर सर्व धमोत्तर असलेली व नाच चांगला डीजे लागला...आहे घ्या नाचून असे मत असणारी जनता सहभागी असते असे स्पस्ट नमूद करावेसे वाटते.
                              ज्या गौतमाने आम्रपालीची खीर प्राशन करून तथाकथित वेश्येव्यवसायाच्या द्वंद्वकळीस खुडणारा वैचारिक कर्तव्यसिद्धांत आखला त्या धर्तीवर वैचारिकतेने सिद्ध झालेले तरुण बोटमोजकेच म्हणावे लागेल.शेवटी असे कि,शिका संघटित व्हा,अन संघर्ष करा!हा मंत्र सुद्धा कुठेतरी अज्ञानी विचाराने जळत आहे!घरातली मिठमिर्ची बघावी-भागवी  म्हणून पोराला वावरात शेळ्या,ढोरं वळायला पाठविणारा बाप बाबासाहेबांनी सांगितलेल्या कोणत्या  तत्वावर आरूढ आहे!हे सिद्ध करावं.शहरात वेगळी परिस्थिती नाही.आम्ही मिळेल तितक्या पगारीत घर भागवतो.स्वप्न नसतात आम्हांला मोठे मोठे.महापालिकेचे गटार साफ करण्याची काम आम्ही आमच्या मुलांनी आमचे मरण झाले की करण्यास सज्ज असावं असे शिक्षण देणारी कुटुंबव्यवस्था आहे.त्याला आमची दारीद्यताही तितकीच महत्वाची.मग तिला दोष देत बसून परिस्थिती कधी परिवर्तन अंगी बनवायची?हा रोकडा सवाल आहे.धम्मजनतेस!
                                         प्रज्ञा-शील-करुणा अंगी बाणवून त्रिकाळाच्या गुलामीला नभात घालवून लावणारी विचारक्षमता आम्ही हरवीत चाललो आहे काय?करूणा तर कोणत्या जितर्बाचं नाव हो?असा पुण्यातला एक तरुण विचारतो.विद्रोही साहित्य सम्मेलनात त्याची भेट झाली होती.तो बोलू लागला
आज बौद्ध धर्मीय लोकांच्या सहनशील तेचा सुद्धा अंत झाला आहे.भारतातच नव्हे तर  म्यानमार, चीनयेथे बौद्ध धर्मीय लोकांनी मुस्लिमांना हाकलणे सुरु केले आहे. तशीच सहिष्णुता पृथ्वी ला अपेक्षित आहे का?म्हणून मी म्हणतो करुणेचा जित्रब कोठे आहे?
                           कदाचित तो बुद्धांनी शिकविले ज्ञानविज्ञान वास्तवाच्या कसोटीवर घासत असेल? का सुचावं असं त्याला?का म्हणावं त्यानं जित्रब?हाच सवाल आहे वैचारिकतेच्या पातळीवरचा.........!
टीप:-वैचारिक पातळीवर चर्चा व्हावी हि विनंती!






Comments

Popular posts from this blog