सदा
सदा आपल्याच वयाचा. अगदी निर्भीड अन प्रामाणिक. त्याने आपल्या बापाशी
बोलतांनाही कोणता भीडभय कधीच घेतला नाही. त्याची काय मानसिकता असेल ? बाप नुसतां म्हणला की पोरा तुलं जे योग्य वाटते
ते करत रहा. तुह्या जीवनाचा तू हाये. पण चांगलं करत रहा. जिंदगानी हारेक्दा नाही.
पुन्हा जगायचं तर जगन नाही. मरण आलं की कोन्ही नाही. स्वतालाच मरावं लागतंय. त्यो
अगदी विचारासारखा निर्भीड, निस्सीम जगत आहे. जगतांनी त्याने कोणताही हिशोब केला
नाही. की करत नाही. असंख्य समस्या ,अडचणी, मानसिक बदल त्याला ग्रासून जातात त्यो
डगमगत नाही, खंभीरपणे जगण्याचा मार्ग पुढे आक्रमत आहे. त्याची प्रेरणा काय असेल
? कश्यातून तो इतका विचारी आणि निर्व्याज
जगण्याचा ठेवा घेवून जगत असेल ? एक कोडे असते सदासदैव.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Comments
Post a Comment