***वैचारिक संकेत***
"लहानपणच्या आठवणी तर्रारून आल्या.धोतरे मास्तर जीव तोडून शिकवायचे तेव्हा लैय बेस मनास वाटायचं.त्या कोल्ह्याची गोस्ट....."खरं तर ललित ,गद्य,पद्य,स्फुट जसं अनुभवानं लिहावं तसं लेखन अंग त्यातही दिसून येते.मुख्यत्वे म्हणजे बालमनातील गूढ काहीवेळ लपून असतं मात्र अविष्कार तंत्राच्या माध्यमातून ते समोर स्पस्ट होत जातेच.तसे लेखनशैलीचे वैशिष्टय म्हणता येईल.मराठीची जाणीव हि त्या अर्थबोधक व संबोधबोधक शब्दवापरातून लक्षात येते.किमान त्यातील तत्कालीन अर्थबोधी म्हणी,कोपरखळी बोल,तार्किकत्व तसेच अलंकार, वाक्प्रचार व कोडीसंकल्पना या गोष्टी आणाव्या लागतात!त्याची साहित्यादृष्टीने यथोचित ग्वाही लागते!असे एक विवेचणीय मत मांडायला हरकत नाही.बाळ जसे खोडकर असते तसे मराठी भाषेतील शब्द व अलंकारांचे तत्व आहे असे एक वैचारिक संकेत..!"


Comments

Popular posts from this blog