★★★कित्ती पिढ्यां
गु-मुताच्या घाणी जगावं?★★★
जर बंद झालं हे काम
तर कचरा डेपोजवळून नाकातोंडाला मास्क,पदर अन दस्ती लावणारा
अन घरातल्या घरात गु-घाण-मूतमैला ड्रेनेजमध्ये सोडणारा सारा समाज वासाने तुंबून
मरेल.तुम्ही हे काम चोख करावं.कटकट नको आणि दिवाळीतही स्वच्छ व सुवासिक दिवाळी
व्हावी म्हणून,
"मालक दिवाळी बोनस देतील.पेढे देतील."
"कुणाला तर कपडेलत्ते करतील."
"चार दोन पुडकं हाती टेकवत म्हणतील,"
"अरे हे खास तुमच्यासाठी हम्म... "
"मागच्या मालकाने मागच्या दिवाळीला काहीच केलं नाही."
"मी विसरणार नाही.इतका मी अमानुष नाही."
"माणुसकी जपून आहे."
आणि हातावर तुरी ठेवतील.आज पैसे नाही म्हणून दिलेले पुडकं काही काळ बरे वाटतील.ही दिवाळीची सुगी नसून गुलामीच्या राज्यातल्या जनावरांना दाखवल्या जाणारा चारा आहे.
ज्या कामातून मानवी अस्तित्वाची अधिकारता आणि मूलभूत हक्कांच्या भूमिकेची लाथाळनी होते.ते काम गुलामीपणाचं असतं.ते काम स्वतःहून करायला मानसिक प्रक्रिया तयारीनिशी नसते.अश्यावेळी सर्वस्वी व्यवस्था मृत्यूकडे ओढवते.पण का मानवी समूहालाच ते काम करायला भाग पाडल्या जाते? त्या व्यवस्थेचे पाईक ते काम उच्च व धर्माने दिलेल्या अध्यात्मिक सुखाच्या ठाई आहे असे का भुलावन केल्या जाते?
कारण मानवी समूहातले बुद्धिजीवी आणि स्वतःला उच्चकोटीतले मानणारे अश्या कामाला उत्कृष्ठ आहे असे भासवून मानवी समूहातल्यातल्या अडाणी,अज्ञानी आणि मानसिक,आर्थिक,सामाजिक, भावनिक,राजकीय,भौतिकस्थितीने आणि शैक्षणिक प्रगतीने अस्थिर असणाऱ्या,गरीब,असहाय आणि दुर्बल घटकाला गलिच्छ काम करायला भाग पडतात.ही एका वर्चस्ववादी घटकाची दुर्बल घटकावर लादलेली खेळीच आहे.वसाहतवादी व्यवस्थेचे हे रूप आहे.
परंपरा ह्या बाबींना धार्मिक शालीत गुंडाळून लपेटून ठेवत कधीही ह्या मानवी हक्कांसाठी आणि समातेच्या अधिकारासाठी उघड करत नाही.धर्माचे हे अंगिक राजकारणच असते.कारण धर्म हा दासाला दास आणि श्रेष्ठाला श्रेष्ठच ठेवणारे तत्वज्ञान पोसून इथवर आला आहे.दासाचा जर श्रेष्ठ झाला तर श्रेष्ठत्व ही संकल्पना मोडकळीस येऊन जे श्रेष्ठ म्हणवतात,अधिराज्य करतात त्यांनाच दास म्हणून जगावं लागेल.हे उलटपक्षी धर्मराजकारण होऊ नये म्हणून व्यवस्था परंपरा मोडण्यास धजत नाही.इव्हन तसे करणाऱ्याला खतम केल्या जाते.धर्माच्या गोटात कित्तेक परिवर्तनवादी जीव कापल्या,जाळल्या,भाजल्या आणि सुळावर गेले आहेत.म्हणून परिवर्तन थांबले नाही.उलट त्याची विचारसरणी धारदार आणि चाणाक्षपणा घेऊन सज्ज झालेली काळाने पाहिलेली पाहत आहे.
मूळ गुजरातचा असलेला मेहतर समाज पंढरपुरात गेल्या १२५ वर्षांपासून राहून मानवी मलमूत्र साफ करण्याची सेवा करीत आहे.आषाढी व कार्तिकी यात्रेच्या काळात तर मेहतर समाजाच्या स्वच्छता कामगारांकडून मानवी मलमूत्र साफ करण्याचे काम रात्रंदिवस केले जाते.विशेषत: पंढरपूरवासीयांचे आरोग्यच नव्हे,तर भीमा नदीतीरी असलेल्या सर्व गावांचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याचे काम हा समाज करतो.चंद्रभागेचे वाळवंट व पटांगणावरील मैला हाताने साफ करण्याचे काम हाच समाज करीत असतो.गु-मूत-घाण दूर करण्याचं काम मेहतर समाजाकडून वर्षानुवर्षं करून घेतलं जातं.मानवी विष्ठा हाताने साफ करायला आणि ते डोक्यावर वाहून न्यायला कायद्यानं बंदी आहे.पण कायदा होऊन २५वर्षं उलटली तरी मेहतर समाजाची या कामातून सुटका झालेली नाही हे वास्तव आहे.एकाच समूहसमाजाने हे काम करण्याचा ठेका घेतला आहे का? का करावं लागतं हे काम त्याच वर्गाला?
केवळ पंढरपूरपूरताच हा प्रश्न नसून जिथे जिथे भारतीय भूमीत भंगी,मेहतर,आणि कामदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.उदाहरणदाखल पंढरपूरचा विषय घेतला आहे.कारण वारीची लोकसंख्या आणि त्या गुणोत्तरात मैला-घाण-गु-मुताची उपलब्धी सकाळ संध्याकाळ हाताने साफ करणारा वर्ग यांच्या मानसिकतेच्या आणि आरोग्याच्या संदर्भात असे प्रश्न डोळ्यासमोर ठेवता येतील.
मैला डोक्यावर घेऊन जाणे वा गटारात घुसून सफाई करणे हे काम लहान नाही असे समाजणाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना शिकून सवरून सरकारी नोकरीसाठी अर्ज करायला सांगावे व समाजाची सेवा करावी.आपला मूलभूत हक्क जाणावा. जातिव्यवस्थेचे गुलाम जिणे का जगतात? एका जातीने हे काम करावे असा कोणता धर्म सांगतो ? साफसफाईचे काम करण्यात त्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो." हा आनंद आता स्वतःला उच्चजातीचे समजणार्यांनी बाळगावा.मग मैला,घाण आणि सडलेल्या गु-मुताचे (शुद्ध शब्दांत मलविष्टेचे) जग कळून येईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या सफाईच्या कामाची निंदा केली आहे."भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील.त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की,त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात पसरून ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील." -बहिष्कृत भारत : २३डिसेंबर१९२७-या विधानात त्यांचा धंदा "नीच' आहे असा शब्द वापर केला आहे.यावरून असे म्हणता येईल की,बाबासाहेब सफाईच्या या धंद्याला उच्च मानीत नव्हते.मांग-महार वतनामध्ये गावात स्वच्छता ठेवण्याचे काम जे मांग-महारांच्या शिरावर ठेवण्यात आले होते ते कसे बेकायदेशीर आहे हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात ठराव क्र.६" गावात स्वच्छता ठेवणे हे मांगा-महारांचे एक काम आहे.असे ता.२८जून१८८८च्या ४२७३च्या सरकारी ठरावाने ठरविण्यात आले.
वतनदार कामदारासंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमाशी हा ठराव विसंगत आहे.तरी तो सरकारने ताबडतोब रद्द कारवा.अशी या परिषदेची आग्रहपुरःसर सुचना होती." ठराव क्र ७ " हे वतनदार कामदारासंबंधांच्या कायद्याच्या कलम ४ च्या ठरावावरून स्पष्ट होते.तरी मांगा-महारांना रयतेच्या खाजगी कामाच्या जबाबदारीतून मुक्त करणे अवश्य आहे.असे या परिषदेचे मत आहे."बहिष्कृत भारत :२सप्टेंबर१९२७ "हा ठराव ताबडतोब रद्द कारवां असे ठरले."
"जबाबदारीतून मुक्त करणे" हे वाक्य सफाई कामाच्या निषेधाचे द्योतक आहे."सफाई काम अथवा भंगी काम करणाऱ्या गर्भवती महिलेला आपल्या मुलासाठी सफाई कामगाराच्या पदाची भूल पडते."अश्या आशयाचे उद्गार बाबासाहेबांनी काढले आहे.
पुढे बाबुराव बागुल यांच्या (जेव्हा मी जात चोरली होती...!) आणि इतर साहित्यातूनही बव्हंशी वास्तवाचा परिवर्तनवादी विचार आणि शोषित, उपेक्षित,झोपडपट्टीतील,फुटपाथवरील भटके जनजीवणाचे भेदक चित्रण करून प्रभावी व विद्रोही भाषाशैली,जिवंत प्रसंगचित्रण,कारूण्य आणि क्रुरता रेखाटनातून समजाला गुलामीविरुद्ध बंड करण्याचे तंत्र दिले.
खरे तर -"He was in full revolt against his parents who were insisting he give up his studies and become a Bhangi. He stood now, waiting for his father to say something so that he might attack him with the help of his powerful vocabulary. In the school and in the settlement, he had been able to defeat the great and the good in debate and even now, when his father was on his deathbed, he was intent on demolishing the old man’s decision to make his son a Bhangi."बाबुराव बागुलांचा हा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पाहिजे तितक्या प्रखरतेने गेलेला नाही आज हे वास्तव आहे.
खोल जाऊन कारण बघितले तर धर्म हाच मुळात कर्मव्याकरणावर अवलंबून आहे.त्याचे सकल नीतिशास्त्र धर्माने चालते.धर्मशास्त्रांचा संकेत व कायदा आहे जो कोणत्याही धर्माची आस्था बाळगणारे स्वप्नातही ते जोखड तोडू शकत नाही.मग धर्मात समसमान्यता आणि बंधुता,समता,समानता आहे का? असा उलपक्षी सवाल उभा राहतो.धर्माचे बंधने धर्ममार्तंड ते तोडू देत नाही.ज्या दिवशी वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला,मेहतर,भंगी आणि कामदारांच्या वर्गाला धर्मव्यवस्थेचे जटिल समजतील तेव्हा,ही मानसिकता खतम होईल.

#वंचितांच्या दिवाळीचे काळज मांडतांना...
Comments
Post a Comment