***नसून तरली अवनी त्या शेषशिरावरती....
श्रमिक अन कष्टकऱ्यांच्या तरली तळहातावर्ती***
श्रमिक अन कष्टकऱ्यांच्या तरली तळहातावर्ती***
"लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे,द.ना.गव्हाणकर,आणि शाहीर अमर शेख
या त्रिमूर्ती लाल बावटा कलापथकाची महाराष्ट्र एक करण्याची ललकारी आणि स.का.पाटील
व मोररारजी देसाई यांच्या तत्वाला जोर देऊन हाणून पाडणारी श्रमजीवी वर्गाची लढाऊ
वृत्ती 1945 ला एकत्रीकरण होत होती .आणि जगाच्या पाठीवर नवा
श्रममूल्यात्मक मानवी जीवनजाणिवांचा संयुक्त इतिहास उभा राहत होता.पुढे 1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘जागतिक कामगार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1
मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची
निर्मिती झाल्याने ‘महाराष्ट्र दिन’ साजरा
करण्यात येतो. तर 1 मे रोजीच ‘जागतिक
कामगार दिन’ सुद्धा पाळण्यात येतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय
कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी
पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. प्रत्येक वर्षी 1 मे रोजी
जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.
कामगार दिनाचा इतिहास…
औद्योगिक क्रांती
झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला. मात्र, या कामगारांची
पिळवणूकही होत होती. कुठलीही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 14 तास कामगारांना राबवून घेतले जात होते.
यासर्वांविरोधात कामगार एकत्र आले आणि कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक
कामगाराला केवळ 8 तास काम असावे, असा
ठराव घेतला गेला. मात्र, उद्योजक जुमानत नसल्याने
कामगारांकडून मोठे आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन
आंतरराष्ट्रीय अधिवेशनं झाली आणि त्यानंतर 1891 पासून ‘1
मे’ हा कामगारदिन पाळण्यास सुरुवात झाली.
कामगारांच्या प्रमुख
मागण्या
– कायद्याने 8 तासांचा दिवस
– लहान मुलांना कामाला
लावण्यावर बंदी
– महिला कामगारांच्या
कामावर मर्यादा
– रात्रीचे काम व
धोक्याचे काम यासाठी खास नियम
– कायद्याने साप्ताहिक
सुट्टी
– कामाचा मोबदला
वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
– समान कामासाठी समान
वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या
औद्योगिक
राष्ट्रांमधील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार 1 मे
दिन साजरा करु लागले. त्यामुळे 1 मे दिवस आंरराष्ट्रीय
ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या
पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला.
भारतामध्ये पहिला
कामगार दिन
भारतातील पहिला
कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात श्रमिक शक्तीला
महत्वाचे स्थान दिले आहे.त्यासाठी लढा दिला.मजुरांना 8 तसच
काम असावे असे मजूर मंत्री असतांना बिल केले.पुढे ते पास झाले,इकडे लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच
दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर
यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता.
"त्या लढ्यातील प्रत्येक जीवाला विनम्र अभिवादन..."
"त्या लढ्यातील प्रत्येक जीवाला विनम्र अभिवादन..."
Comments
Post a Comment