***चिकित्सा वर्तनवादाची***             
 आपण जे शिक्षण घेतो ते आतापर्यंत वर्तनवादावर आधारित होते.ज्यात ज्ञान बाहेरून आत्मसात करण्याचे भरीव कार्य केले जाते.खरे तर त्यात गोष्टी सिकविलीस जातात,घोटून घेतल्या जातात.म्हणूनच काही कालब्धीतच संशोधनानंतर वर्तनवादी शिक्षण पद्धतीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
ज्ञान अफाट आहे.त्याला सीमा नाहीत.आणि आयुष्य लहान असल्याने ते जीवनभर जरी ज्ञान आत्मसात करणे वाटले तरी उणीव हि असतेच.सगळेच शिकवून,शिकून होणे नाही,आणि होतही नसतेच म्हणा.शिवाय शिकविलेले सगळेच कळले असेही नाही.एखाद्याला खूप पाठांतर येते व त्यास अर्थ न कळताच त्या गोष्टी घडाघडा सांगू शकतो.त्यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणून स्वीकार करतो.परंतु अशी बुद्धिमान व्यक्ती जीवनसंग्रामाच्या काळी किती यशस्वीत होते हे स्पष्ट कथन करणे कठीणच आहे.कारण"कबीर साहेब "म्हणतात की "सब दिन होत न समाना"म्हणजे सारे दिवस सारखेच नसतात.माणसासाठी का होईना ते समान असू शकत नाहीत.काहीतरी नवीन अनुभव घेऊन येत असतात पहाट करत परिवर्तनाची.आणि होते उत्क्रांती विचारविनिमयाची या ठिकाणी.हरदिन असं घडेलच असे नाही.नानाप्रकारच्या शिकत असतो आपण काहो गोष्टी यथोचित. आणि हो नांदी असते ती  खरी वर्तनाची.वर्तनवादाची.वेगवेगळ्या घेऊून येणाऱ्या अनुभवांना आपण एकाच प्रकारछटा प्रतिक्रिया देऊ शकत नाही.कारण पृथ्वीचे नियम हे परिवर्तनातून रूढ होतात.हि परिवर्तनाची प्रक्रिया आयुष्यभर चालते.म्हणूनच वर्तनवादी शिक्षण पद्धतीची शिदोरी बदलत्या कालीक परिवर्तनवादी शिक्षण पद्धतीस पूरक ठरत नाही .हे सत्य नाकारता येत नाही.                                      


Comments

Popular posts from this blog