***मूलभूत तत्वांचा लढा***
ज्ञानप्रवाह हा सीमांततेच्या आडमार्गाला आडत नसतो.तो प्रवाहित असतो. ज्ञान,विवेक,सत्याने लोकशाही व्यवस्थेची स्वतः मानवतावादातून उभारणी कराण्याची नित्तांत आवश्यकता असते.
भुकेल्या व गुलामांचा लढा हा सत्तेच्या व संपत्तीच्या एकधिकारशाही मिळविलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात असतो.
हुकुमी व्यवस्थेच्या विरोधातील लढ्याला मुस्कटदाबी म्हणून मोर्चे,आंदोलने,उपोषणे,मिरवणूक,सभा,यावरतव्यवस्था अडमार्ग आणत असते.
अश्यावेळी स्वतंत्र विवेकाच्या अंगाने व सत्याने विचार करून लढ्यासाठी झटून सामोरे गेले पाहिजे.
वर्णवर्चस्ववादांच्यामुळे राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक,मानसिक,
भाषिक,संघर्ष उभे राहतात.ते अस्तित्वाचे द्वोतक असतात.तळागाळातील शोषितांना यावेळी या व्यवस्था अंजून घेणे गरजेचे व परिवर्तनाची नांदी यास्तव दुसरा मुक्तता मार्ग नसताे.
याचबरोबर जुन्या-नव्या परंपरागत रितिरुढी,चाली,रिवाजांचा अभ्यास तठस्थेने आणि चिकित्सक वृत्तीने केला पाहिजे. इतिहासाचे मूळ शोधले पाहिजे.का?कश्यासाठी ?कसे व केव्हा?असा सखोल अभ्यास केला पाहिजे.
ज्ञानार्जनाची सततता ही परिवर्तनाला दिशा देत असते.ती टिकून ठेवण्यात यावे.
शील,स्वभाव,आणि ज्ञानाची आजतागायतता लढण्यास स्वयंपूर्ण,सिद्ध व निष्ठतेचे प्रेरितं प्राप्त करत असते.
बुद्धीच्या कसोटीवर घासून मानवतेला पोषक अशी लोकशाही निर्मिती ही सुधारकी राज्यव्यवस्थेचे प्रतीक असते.ते जनतेच्या कल्याणार्थ झटणारे व्यवस्थात्मक स्वरूप असते.
धनाढयांच्या आणि गुंडगिरीच्या कचेरीत सापडणारी लोकशाही ही जनतेचे गळे कापत असते.
मजूर,कामगार,स्त्रीया व कष्टकरी,शोषित,पीडित वर्गाला बंधनात ठेवणारा वर्ग हा सत्ताधिकाऱ्यांच्या वलयीत बसलेल्या धनिकांचा व वर्चस्ववाद्यांनी तयार केलेल्या कायद्यांच्या सत्तेवर अधिराज्य करीत आलेला आहे.
कागदी लोकशाही ही पिठाळ दुधाच्या भेसळीसारखी असत्त्यास घट्ट पकडून असते. वर्चस्ववाद्यांना वा एकाधिकारशाहीच्या हुकमी व्यवस्थेला धर्मनिरपेक्षता,समाजवाद,पारदर्शक लोकशाही,सत्तेचे लोकप्रशासन मान्य नसल्यामुळे भ्रष्टाचार,अविकसितता,गुन्हेगारी,अन्याय अत्याचाराचे पेव तिथे फुटल्याशिवाय राहत नाहीत.
ज्या लोकशाहीतील एक समाज उपाशी व एक समाज लाडू खाण्यात मश्गुल असेल तर ती लोकशाही समाजवादाच्या खूप दूर गेलेला असतो.
प्रत्येकाला अन्न,वस्त्र,शिक्षण,निवांत,आरोग्य व मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि तो विचार हा त्या राष्ट्रनिर्मितीचा उद्देश आणि उद्दिष्ट्यातील स्वातंत्र्याच्या,बंधुतेच्या न्याय्यतेच्या दृष्टीने पुरस्कृत असावा.
बेकायदेशीर राज्यव्यवस्था ही लोकशाहीला घातक अशी राज्यव्यवस्था असते. समतेशिवाय लोकशाही टिकत नाही.अन धर्मांधवृत्ती,जातीपातीव्यवस्था,धनशाही,वंश,लिंग,पंथ,अविवेकीचा विचार,ह्या बाबी अविकसिततेच्या पायाला मजबूत करून विषमता टिकविता आली आहेत.
भारतीय परिप्रेक्षात तरी तरुणांनी वास्तवातील अव्यवस्थेचे लोकशाही तत्वाने धोरण अंगिकारले पाहिजे.मानवतेची हितोपासना करणारी विकसित दृष्टी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.
दारिद्र्य,विध्वंसक वृत्ती,हिंस्त्रता, भांडवलशाही,आणि गुलामीतून सुटण्यासाठी प्रत्येकाने मुक्तता मार्गास गेले पाहिजे. ज्ञान मिळविले पाहिजे.शील टिकून ठेवले पाहिजे,शक्ती जोपासली पाहिजे.
स्वातंत्र्य हे सत्य,न्याय्यबुद्धीने घेतले पाहिजे.विचाराने स्वातंत्र्य हे वैचारिक गुलामगिरी नष्ट करीत असते.
नैसर्गिकतेची होळी करणारी भांडवली व्यवस्था पार हद्दपार केली पाहिजे जी मानवतेच्या अस्तित्वास घातक व विषारी सर्पासारखी डुख धरून असते.
विश्वात वैश्विकतेची कास धरून समतेच्या मानवता दृष्टीने पोषक,न्यायाधारीत एकता,बंधुता,समानता,स्वातंत्र्यात,एकात्मता यांची सखोल अशी विवेकीअंगाने उभारणी करणे आज युगांची तत्वतः गरज आहे.

Comments

Popular posts from this blog