गीतरचना

***मित्रहो***

मित्रहो माझे मित्रहो....

मैतृत्वाचे गीत मी गातो आहे
चला या मी तुम्हा बोलावतो आहे

ऐकून जे शब्द तुम्ही
फुलून जाता हो 
पुढे जाताजाता
वळूनि मागे बघता
ते औदार्याचे सूर मी गातो आहे...!

जनता शिकारी ही तुम्हांला
दगा देऊन जाती
सावज होऊनि तुम्ही
देऊन मोका घेती
आता मी विश्वा समजावतो आहे...!





***शोध***

मी माझे हरवून काही
राहिलो तुज शोधण्या
निमिषे वाट पाहती
घेऊनि नजरा उसण्या

कंप उठूनी काळजा
श्वास मिटती ओठांवरती


***चांदवा***

लाभतो का दुरावा
पौर्णिमेच्या चांदव्याला

असून नभांगणाती
परी दूर का तारका

उसासला आसमंत गारवा
उजळुनी सृष्टी अर्पितो
ढगाशी लपतो चांदवा


***इथे ओशाळला मृत्यू!***

"पहाड खऱ्या मानुस्कीचा
इथे धारार्ड धर्ड कोसळला
जग्न्याची आंतरिक
कुर्तडवढ हि न्यारी
इथे मृत्यूही ओशाळला....

जीत्ता जीव व्हता
सख्ख्यानीच लोटलं दूर
परक्यांची तमा बाळगू
का?जग्नं हाये फितूर
अंतरातला जीव
इथे हो कळवळला
इथे मृत्युही ओशाळला....

तहानलेलं जग्नं भग्नं
घोटभर पिऊ देईनं
डोंगरपरी दुःख गहन
डोई भार हा सोसेनं
अंती निसर्ग हा खळखळला
इथे मृत्यूही ओशाळला...

झाला दुःखांत आत्ता
शव धर्नीवरी शांत
मांडला शोक-आकांत ना
पडली का ?सख्यास भ्रांन्त
जिणं मर्न खेळ मुर्गाळला
इथे मृत्यूही ओशाळला...

***सत्यशब्द***

"तुका जाई पंढरीशी
होई  तुका वारकरी
मांडुनिया सत्य सार
शब्द विश्वा झडकरी...!

दिवा जळे तम नासे
तसे होई ज्ञान सार
फिटे कुळे अज्ञानाचे
धर्मांध काळुसे फार...!

शोधुनिया घे गहन
घोर शुद्ध असे गुज
तत्वते पार अपार
माणुसकी मूळ निज...!

सुख हेचि जाहले हे
एकरूप जीव आले
विश्वा दुजाभाव मिटो
अभंग सत्यशब्दले.......!"

गीत

स्वागतगीत

स्वागत करूया सकल जनांचे
दीपक लावूया सुजल कलांचे
स्वागतम हो सुस्वागतम
अथस्वागतम शुभस्वागतम

उगवला आज हा दिन
पदस्पर्शाने या भू पावन
शब्दसुमनांनी उपस्थितांचे
स्वागत करूया सकल जनांचे
स्वागतम हो सुस्वागतम
अथस्वागतम शुभस्वागतम







गीत

स्वच्छता अभियान गीत

स्वच्छ करूया गावाला हो
स्वच्छ करूया गावाला
आळा घालूया घाणीला हो
आळा घालूया घाणीला //धृ//

घरोघरी बांधा संडास दारी
आरोग्य नांदेल तुमच्या घरी
नष्ट करूया रोगराईला हो
आळा घालूया घाणीला //1//

श्रमदान करा मंडळी सारी
साधेल विकास देशाचा भारी
कष्ट लावूया साफसफैला हो
आळा घालूया घाणीला //2//

पाण्याचा अति वापर टाळा
परिसर सारा स्वच्छता करा
शाहीर सांगे कहाणी खरी
मग येईल गाव एक नंबरी
साह्य करूया विकासाला हो
आळा घालूया घाणीला हो//3//

गीत

भीमगित

भीमा तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे
तुझा वसा आम्ही पुढे नेणार आहे

समता बंधुभाव एकी
न्यायी मार्गी या चालू
उद्धार करण्या दलिता
घाव गरिबी घालू
ज्ञानाने आज्ञानी अंधार चिरणार आहे










गीत

थेंब ओथांब्या राहू दे
भिजत्या सरी न्हाऊ दे...//धृ//
हे चित्र देखणे
रंगी स्वप्न हेरणे
अनंती जिवा लाभू दे...//1//
अर्थ वेगळा खुनी
छंद आगळा मनी
जीवनी धुंद होऊ दे...//2//
नित्य हसता तुला
शब्द झेलता मला
संगती धन्य होऊ दे...//3//
मी पाहीन आज
मी आठविन रोज
नियती तुज शोधू दे...//4//
तुझाच मी अन् घे
माझ्यात तू पाहू दे
दे-घे चा खेळ खेळू दे...//5//






गीत

हे चांदणे तू शिंपीत आली
रजनी कशी अवचित झाली
गधं सुमनांचा असा जणू 
जणू मृगजळ पसरली//धृ//
गार गार वारा शीळ देई
नभी अच्युत्य नाद होई
स्वर स्पसुरांचा जसा
जणू सुरावळ गाजली//1//
धुंद धुंद अवेळ सारी
बेबंद प्रभा ही माहिती न्यारी
स्वर्ण प्रजक्तांचा ठसा
जणू परिमळ धुंदली//2//
पार अपार विश्वाची गोडी
बंधनी अदम्य साकडी
चंद्र तारकांचा वसा
जणू सकाळ उजाडली//3//





गीत

या बाळांनो या रे या
लवकर सारे या रे या
या मुलांनो या रे या
भरभर सारे या रे या//धृ//
शाळेत येवून अभ्यास करून
स्वप्न नवयुगचिया पाहूया//1//
शाळेत ज्ञान सारे तुटेल अज्ञान जाळे
ध्यास धरून शिकून सवरून 
बळकट भारता या करूया//2//
पुस्तकी गूढ लपले वाचेल तेचि वाचले
शब्द स्फुरून वाक्य उच्चारून
उभ्या जगाया सावरूया//3//
जातीपाती अधर्म मिटवू एकमेकां आधार देवू
शांती धरून क्रांती करून
देशा महासत्ता बनवूया//4//
न्याय देवू अन्याया छेद आनंदाने सारे राहू
ज्ञान देवून प्रेम अर्पूण
अवघे विश्वाया जिंकूया//5//






गीत

वदू कसे मी तुजपाशी
हे शब्द ओठावरले...//धृ//

जीव बावरा श्वास कावरा
या धुंद क्षणी
हे हृदय बावरले...//1//

नयनी भाव रंगला डाव
या खेळवेळी 
हे रंध्र थरथरले...//2//

छंद मनाचा बंध प्रीतीचा
या मृगजळी
हे श्वास फितुरले...//3//

स्वप्नांच्या राती पेटत्या वाती
या सांजखुली
हे तेज बहरले...//4//

श्वास उठती ओठ मिटती
या विश्वलहरी
हे विश्व काहूरले...//5//




गीत

माझ्या मना स सांगना
घडला कसा हा गुन्हा//धृ//

तुझ्यासाठीच रे मी 
माझ्यासाठीच रे तू
बंध का तोडिले तू या क्षणा
अश्रू येई नयना...//1//

ओतले शब्द मी
हृदय कापिले मी
रंग का सोडिले तू
ये सोबती या जीवना...//2/

क्रूर क्षणी अश्या
घाव निक्षिले मी
स्तब्ध का सांडिले तू या क्षणा
का देण्या ह्या यातना...//3//

तुझ्यासाठीच रे मी
घाव झेलिले खरे
भंग का स्वप्निले तू या क्षणा
विश्वाच्या त्या कवणा..//4//

गीत

मनी पूर हा दाटलेला
आज नवा सुर उठलेला
भावनांच्या पाऊसधारा
मनमेघ गारठलेला...//धृ//

आला बिंदू नभीतुन उधळून आनंद सिंधू
हृदयाच्या मनमोरा
चिंब ओला भिजलेला...//1//

ओघळून स्पर्श अंगा रंगा खिदळून हर्ष
मोहनीच्या गारवारा
धुंद जीव कासाविसेला...//2//

अकांत हा ओसंडून प्रेमातून असे तांडव
असुवेच्या जलधारा
मंद ओघ वाहिलेला...//3//

तुजसाठीच असा जसा मजजीव होता
विश्वांच्या नियतीतारा
बेबंद घाव पेललेला...//4//


***प्रेमगीत***

पाहता तुज हा विचार आला
उन्हाळ जीवन होते 
तू सावली जशी झाली

पुन्हा हृदयात भेदून हवं गेली
समजावीत शब्दलो ते
तू निराळी जशी झाली

सोडून गेलीस तेव्हा आठविण तुझे
दिलगिरीत पाल्हाळ तू
काहिली जाशी झाली

गाऊ शजलो नाही कधीच प्रेमगीत ते
आवळीत सुराळ तू
गायिली जशी झाली






***ज्ञानांजन***

"मातले अज्ञान    थैमानसे घाली
स्व हा तोचि वाली    विश्वातून........(धृ)

पारखून खरे    विचार ते ठेवा
उध्दारच व्हावा    हे विज्ञान...........(१)

ज्ञानाचिया पुढे    अंधार जळती
ती ठेवा पेटती    दिव्यखून............(२)

म्हणे विश्वा सत्य     घ्यावे जना तुम्ही
घेतले आम्ही हे    ज्ञानांजन...........(३)










लावणी

हीचे सोळा सिनगार
करि जीव बेकार
नार लैय सुकुमार
करि कीव बेजार

ही द्वाड मदनाची ख्वाड राणी
ती आड सजनाची ग्वाड पाणी....//धृ//

नार मदनाची इंगळी इश्काची
तिच्या होटात बी डाळिंबाची
चंद्रमुखी खळी लाजरी गालाची
अहो डोळ्यात ती सुकंचुकी......//1//

अशी चाड वळणाची याद वाणी
ती आड सजनाची ग्वाड पाणी

वर नाकतुरा तरण्या नजरा
झिंगल्या अंगी रंगी नखरा
तरातरा चाल पहाना होजरा
राया कमरेत ती लचकी
जशी पाड कोकणाची माड वणी
ती आड सजनाची ग्वाड पाणी....//2//

निघाली नार रं
डोई ती घागर...
निसटे पदर
येता घर..!


बुधवंदना

धम्मपहाट झाली रे
उठ आता जाग
शिकून संघटित हो
सुकार्या ह्या लाग......//धृ//

धम्माचा तेजोमेघ निळ्या नभी पसरला
ज्ञान बुद्धी तर्काचा भीम गौतमीने दिधला
प्रज्ञा शील करुणेने
कर अहंकाराचा त्याग....//1//

आचरणाने पंचशीलाला अंगी बाणवून घे
त्रिकालाच्या गुलामीच्या नभी घालवून दे
चोरी लबाडी खोट्या
कुकार्या ह्या लाज.......//2//

अज्ञानाचा अंधःकार हा ज्ञानसूर्याने दूर लोटला
दुःखी पीडी शोषितांच्यावाटी हा धम्मदीप पेटला
अधर्मा रोधी संघर्षाची
पेटती ठेवा आग........//3//

गीत

उर फाटला फाटला
घाम दाटला दाटला
कळ डोस्क्यात उठली
या आख्या उन्हानं
ताप अंगात शिरली.......//धृ//

सारं शिवार भकासलं
ऊन ईखावाणी पडलं
कशी झाडंही सुकली.....//1//

जव्हां ऊन चढे वरती
घेई डोस्कं गिरगिरकी
ज्वार अंगात भरली......//2//

जिव्हारी लाही लाही भासे
प्राण उभे भट्टीत जसे
स्वास् उरात रुतली......//3//

जीव काळानं घेरावला
घाव उन्हानं उगारला
आस जीवातन् उरली....//4//

*****************************************
गीत

कुठे शोधू तुजसी
प्राणप्रियशी
नयन माझिया धुंदीया आली
मी कुठे शोधीशी
सखे ग मी कुठे शोधीशी....///धृ//

रूपे पाहता मती नूरली
दृष्टीस पडता छाया उरली
कुणा करू चौकशी.........//1//

तुझिया पाहण्या अति क्षिणलो
दमलो भागलो गती विरलो
मन फिरे चौदिशी..........//2//

अंत पाहुनिया पार झुरले
चीर हृदयींया का तू घातले
भेटी येई विश्वाशी.........//3//




गीत

जीवनाच्या वाटेवरती एकटा चाललो मी
दुःखे साहूनिया सारी सुखा भेटी 
असावलो मी .......//धृ//

जगी जीवना आलो नातीगोती तुटलेही
घरादारा होऊनि पारखे जगण्या 
निघालो मी.........//1//

कुणी रागे भरला कुणी त्रागे भरला
ज्याच्या त्याच्या स्वभावे शब्द मम निखारला
जाच्याच्या निखाऱ्यातूनी फुफुट्या 
सापडलो मी......//2//

हात रस्त्यावरल्यांनी साथ दिली मायेची उबार
चालण्या विश्वा मार्गा मानुस्कीची आहे आधार
आधार हा धरुनी सागर तरलो मी....//3//











गीत

तुझ्या भावना बोलू लागल्या 
अन् भावनासवे माझिया मना
तोलू लागल्या.......//धृ//

चैत्रातल्या उन्हा सावूल्यांचा 
खेळ इथे रंगला
खेळातुनी निसंक होऊनि 
मम जीव दंगला
अन् शहासवे माझिया डावा
तोलू लागल्या.......//1//

नयनांच्या अश्रूधारांनी 
भरुनी ओंजळ आली
ओंजळीत तरंग होऊनि
नयनी सृष्टी दिसली
अन् या दृष्यासवे माझिया काया
तोलू लागल्या.......//2//

न्यानंग्राच्या युद्धात
तिर जिथे निक्षला
निक्षुनिया रक्तंग होऊनि
देह थिजे आजला
अन् या युध्दासवे माझिया विश्वा
तोलू लागल्या.......//3//



गीत

हा एकांतवास असा
सावरे जीवाला माझ्या
आठवांच्या ओल्या पुरा
सारे आधार हाती तुझ्या....//धृ//

तुटुनी गेले बंध हे
सुटले सारे स्पंदही
उसासला भाव उरी
फिटले विश्वाचे नांदही....//1//

सूर आटले ओठावरले
पाझर नयनी उतरला
चक्षु पटले गारठले
भाव हृदयी ओघळला...//2//

तोडूनी बंधने सारी
विश्वाची मोहिते न्यारी
सारासार अपार पार
करुनि आलो दूर तुझ्या..//3//



गीत

सुखा मुकलो पार आता
दुःखाची ओझी शिरा आली
जीवनाच्या वळणावरती
कशी छाप काळाने घातली...//धृ//

एरव्ही सुखे भेटीस
तृप्त मना लाभली साथ 
दुःख जगी साहूनिया 
खरे सुखे हारली आस
विरहाच्या लाटेवरती
जशी नौका वाऱ्याने गोवली...//1//

सारे एक नेक अनेक
विद्रोहाशी गेले विलया
हारे क्रांती विश्रांती शांती
चित्तवणी नेले पाहाया
वितुष्टाच्या संग्रामावरती
अशी घाव दुःखाने उगारली...//3//




गीत

रडवते का सांग मला तू विरहक्रांती
तुझी नि माझी साथ विरही क्षणाक्षणांती..//धृ//

उसंतला भाव वसंतामधला
उरातली वेडी माया
लावियेला तो जीव आटवलेला 
कणाकणांती//1//

एकांताशी मन एकांताशी पळे
करपली सारी नाते
असुसला पण ऊसासला कळे
मनामनांती//2//

अंधारलेली रात धुंदारलेली
ओसरली सारी दिवसेही
विरहाच्या साथ विश्वा कहराच्या 
कवणाभ्रांती//3//





गीत

भीमगित

कोटी भानूचा उजाला भीम माझा पहिला
होता ज्ञानाचा राजा भीम पहिला पहिला//धृ//

नाग सरिता तीरी अधर्माच्या शिरी 
ज्ञानवंत गौतमच्या शब्दधारी
घाव धम्माने घातिला...//1//

प्रज्ञा शील करुणा क्रांतीची शांती 
शिकवण बुधम्मा प्रितीची
ध्यास सन्मार्गा लागिला..//2//

जोखडा गुलामीच्या ज्ञानखड्गाने
गावातले  सनातन्यांच्या स्वभिमाना
व्रण युगांचा राहिला...//3//

तुझ्या शब्दांचा दिनदुबळ्यांशी धीर
सत्यासवे विश्वाची कवने अधीर
भीम विश्वाने गायिला...//4//



गीत

देशभक्तीपर

शूर सैनिका तुज नमन
मंगल देश बलभरता
करीशी तू रक्षण.....//धृ//

धगधगती मशाल कर क्रांतीची
उज्वल स्वप्ने नवभारताची
उत्क्रांतिसवे ध्येय जयांची
धरीशी तू मनन.....//1//

जहाल छातीतून रक्तस्वास 
उफाळला आज स्वातंत्र्यासम
शत्रूसवे निःपात तयांची
लावीशी तू निशाण.....//2//

मायभूमीसाठी देह आजला
सारी शस्त्रास्त्रे घेऊनि सजला
तिरासवे जी जोम जयांची
होईशी तू अर्पण....//3//



गीत

उस्वास जीवांचे उचंबळून आले
या धगेनं प्राण चवतळून गेले...//धृ//

तेजाची धार ती चकाके
निळ्या नभी जणू वीज चमके
आता सारी राने तेवले...//1//

किरणांची लाली चोरुनी
धरती जलबिंदू पिऊनी
आता सारी शिते पेटले...//1//

चैत्रातल्या उन्हांचा गारवा
आटला स्वास तो जरा
आता सारी स्पंद तुटले...//2//








गीत

नसून तरली अवनी
त्या शेषशिरावरती
शेतकरी अन् कष्टकऱ्यांच्या
तरली तळहावरती...//धृ//

श्रमिकांचे श्रम घावकऱ्यांचा घाम
रातंदिसं साऱ्या जगा 
पोसलं त्या पोशिंद्यानं
कसून कसली धरणी
त्या बळीराजावरती...//1//











विश्वगवळण

वेळ आली आज बोलण्याची
लाज येई मज सांगण्याची.....//धृ//

ऐन दुपारी भलत्या वेळी
सरिता तीरी देखिता बाळी
खेळी खेळे मला गोवण्याची...//1//

लाजवुनी पुरता रंगला
सांडला घडा डोईवरला
वाट पाहे मला रडण्याची.....//2//

नको आजला तुला बोलणे
भलते सारे रास वागणे
घाई आता मला निघण्याची..//3//

तनु सजला हा तुजसाठी
घे शपथ आजला विश्वाची
गाठ तोड मला बांधण्याची...//4//







गीत

मी पाहिले ते स्वप्न सुखातले
तुझे नि माझे हे क्षण कुशीतले...//धृ//

राहू दे हात उशाला जरासा
मऊ केश सांभाराशी हा असा
निस्वास् मग उरे हृदयातले.....//1//

शाही गालिचा मखमली अंग
शहारे कांती मदनाची गंध
सांडूनि सारेच भाव जीवातले...//2//

सखे जवळीक ती साधशी
न राहे या विश्व अंतराची
मांडुनी न्यारेच डाव पटातले...//3//

टाकला शह देह गुंतला
दाह फासला जीव कंठला
धुंदीसवे नयन विश्वाची आता
खुले पहाट पहाट रात्र जाता
विरुनी गेले सुस्वप्न निमिषातले...//4//





गीत

भंगले आता सारे 
काही उरे ना न्यारे
संपले जे होते ते
ना ते डाव रंगले......//धृ//

छेडीता सप्तसुर 
बेसूर झाले चक्काचूर
अर्थ ना राहे त्या शब्दाशी
ना ते  भाव उरले.....//1//

लागे भेटी जिवा
आस क्षणिक काळजा
ध्यास आहे मना
ना ते गाव राहिले.....//2//

कवना कंठ दाटला
ना राहिले कुणी कुणाचे
ना याचे ना त्याचे परके
ना ते विश्व आपुले....//3//







घाटमाथी लोकगीत

शिवारी आला थव्वा
त्यालं अवघा पळवा.....//धृ// 

लाव्ह्ऱ्या पार्व्या ह्या साळुंक्या
फोड्नार कणसं हुर्ड्याची
घुगल्या मैना राघूदा
टिपनार धांडी गं सराची
आता येकीची गरज नेकीची
जोमानं गोफनी फिरवा.....//1//

काळ्या मातीचं रं पारनं
निशाण लाल रक्ताचं
फेडू सारं इस्वासानं
धन उगंल कष्टाचं
घाव बिनीची चीड फळीची
हक्कानं शिवारी मिरवा.....//2//






गीत

दुधाळ चंद्र नभी उगता 
आज मना लाभले सुख.....//धृ//

क्षणाक्षणांच्या हृदयी भावना
कवणा आल्या दाटूनि
जशा कोरकोरांनी चंद्रप्रतिमा
रसाळ अंग दावी निघता.....//1//

लाटाकाठांच्या उधानी भरल्या
उरल्या क्षणांच्या भेटी
सप्त शब्दसुरांनी रंध्रप्रतिभा
मधाळ मंद वाणी बोलता.....//2/







गीत

काळीज हाळ होते
होती घायाळ शब्द
एकांतात माझिया
व्याकुळ मन स्तब्ध.....//धृ//

नशिबात माझिया का 
सांग सांज ढळूनी येते
ढळल्या भावनांना का
तू अशी अंधारुनि नेते...//1//

निशाचर होई नयने
दाही दिशा आज फिरती
आशा मनीषा राही खंत
बोचरी ती सल उरते....//2//

छळ हा दिनरजनीचा
का सुटता सुटेना
शब्दांत तुजला शोधता
सूर का सापडेना
राग झाले अबोलते...//3//



गीत

अण्णा भाऊ होऊनि गेले
विद्वान तरुण
दलितांसाठी तयांनी
झिजविलेत प्राण.....//धृ//

शेषाशिरी अवनी
तरली नसून
सांगे अण्णा भाऊ साठे
जगाला ठासून
शेतकरी पोषितो
कामगार कष्टानं.....//1//
















गीत

लेखणीने अमर झाले
नाव अण्णाभाऊंचे
पनावरती इतिहासाच्या
कोरिले सत्य मानवाचे.....//धृ//

भीमा उकरतो मढी
काढी स्मशानी सोनं
लैय तळमळतो तुका 
केला घात बोटानं
जगण्यासाठी संघर्षाच्या
जोखिले रण मरणाचे.....//1//

भाकरीसाठी मौताग 
भोमक्या उभ्या जगात
रांडक्या व्यवस्थेशी
आहे सवाल शब्दांत
न्यायासाठी भुकेल्यांच्या
मांडिले बंड बंदीस्तांचे.....//2//

खांडुनि रितिरुढीला
आवडीनं घाव केला
जुलमी पुरुषार्थाचा
डाव तिनं मोडला
उद्धारासाठी स्त्रीजातीच्या
तोडिले बंध अन्यायाचे.....//3//


युवागीत

चला हो उन्नती करू
चला हो शांतीने राहू

चला देशास सजवू महान
चला पेटती मशाल घेऊन
चला गावोगावी करू गल्लोगल्ली
रक्तधर्माणे सर्व तरुणा
एक प्रकाशमान होऊ

चला गुलामगिरीची रातही
चिरून ज्ञानप्रकाशाने घालवू
चला दुःखी जणांचे हृदयही
धुऊन शब्दसुखमने फुलुवू
चला फुले होऊन भारता
सारे नवगंधवान ठेवू






शिववंदना

सुटकेचे गनिमी दिले पेटाऱ्यातूनी पेढे
तुरी झाल्या हातावरती बादशहाच्या पुढे
होते अवघे आपुल्कीचे स्वराज्य तुम्हां
प्रथमा वंदितो शिवबा मी तुम्हां
गुलामीस झुंजले म्हणुनी मुक्तावे आम्हां...//धृ//

स्वराज्याचे तोरण बांधे मावळे न् प्रजा
उच निचता न मानी कुळवाडी राजा
व्हावा येक माणूस अन् खऱ्यासवे निधर्मा.//1//

परस्त्री मातेवानी संस्कृती हि खरी
धर्मांध रुढीवरी फ़िर्वी इखारी सूरी
तुम्ची आम्ची आब्रू हाय ती ठेवावे ध्याना..//2//

शहाजीनं दिलं जगण्याचं बळ थोर
जिवा होता त्यो वाचे संघर्ष घनघोर
झिजुनिया झुंजावे शिकवी जिजाऊ मा//3//

जुलूम जबरीचा टोळीचा त्यो होळीचा काळ
जातो कापुन शिवबा जातीपातीची ती नाळ
विश्वा म्हणे मानवता सत्यमेवे पांघराना..//4//


गीत

जेव्हा कधी मी मला
तोलूनि विश्वा पाहिले
माझेच मोल मला
कळवून का राहिले....//धृ//

उरले उरात थोडे
ओझेच अंतरीचे
अश्रूंनी नयनांचे
भिजवून पाट ओले....//1//

म्हणू काय नितीशी
वट खोट्याचीच इथे
सत्याचे काही नाही
गमावून स्व राहिले....//2//








गीत

हाती अण्णानं घेतली रे
मनुवाद्याच्या विरोधी टाक
काळ रुढीचा घाव बिनीचा
जातीपातीची कापुनी नाक....//धृ//

म्हणे विश्वा साठे अण्णाभाऊ
लेखणीने नवमानवा घडवू
सत्याची जाण नीती वाटंला
सूर्य जगी एकीचा पाहू
नको बेकीचा डाव दुजाचा
युद्धा उभा ऱ्हावुनी ठाक.....//1//










अलंकारी

ते श्वास फितूर झाले
नयन हे आतुरले
हे सखे साजणे गं
आता काळीज गहिवरले

साथ प्रिये संग
वणी मृग गंध
येई नव क्रांती
भ्रांती पडे धुंद
होता मन मृग बावरले

हात तुझा हाती
खंत नच येति
देई कीव असुरी
खरी छळे एकांती
गाता शब्दीच घाबरले

स्पर्शी जिवा प्रीत
नवा हर्षी रीत
घेई तव हार
पार जळे चित्त
जाता विश्व सावरले

नित सखे भास
भेटी लागे आस
नेई जीव नच
तेच ढळे ध्यास
होता प्राण डवरले














***माय***
सौ.रत्नकला अर्जुन साठे
या मह्या "माय"लं ह्ये शब्द अर्पण....

"माये तुह्या कृपंचि गाऊ कित्ती म्या गाथा
उप्कार घोर तुह्ये पायाशी तुह्या गं माथा//धृ//

माये तुह्या कृपंनं मलं साव्ली भेटली
तोडून जीव लाव्ला कव्हा कसर न् ठेव्ली
सुरेबिना हो ना पुरी दिव्सास आव्नि आत्ता//१//

मायेचा हाये झरा तू प्रेमाचा थेंब खरा
पाह्लं सुखं दुखं घेत कष्ट लैय जरा
हाये तुह्याचं पाई माये ख्याती आली हाता//२//

नमा गुरुलोकालं म्हना थोर मायेलं
दग्डं नुस्ते तिन्ही धामी माय सत्यस्वामी
म्हने साठे विश्वाची तू आस्सील माय कर्ता//३//

कवी-लेखक-गीतकार












Comments

Popular posts from this blog