ग्रामीण पत्रकार
सन्मान-2018
पत्रकार भवन-पुणे.
पत्रकार भवन-पुणे.
"शब्दांपासून
संस्कृतीपर्यंत आणि उपयुक्त मुल्यांपासून मानवतेपर्यंत विचारांची भाषा असावी.व्यक्त
होण्याला आपली स्वभाषा केव्हाही दिशा देते.आणि खंबीरपणे आपल्याला उभी करते.लिखाण
तत्वाने पुरुषसत्ताक व्यवस्थेशाहीला आव्हान द्यायला हवे.हिजडा समाजाला भाषा
निर्माण करून द्या तेव्हा आमच्याशी संवाद करा.अशी नवी विचारसरणी घेतल्याशिवाय
लैंगिक समानता असणार नाही.सरकारी अर्जात नवा कॉलम उभा राहिला आणि त्याला केवळ चार
वर्षे झाली.माणूस म्हणून या समाजाला मान्यता दिल्या गेली हीच बाब काळाच्या
अनुषंगाने चांगली आहे.पण मातृसत्ताक व पितृसत्ताक पद्धतीने आजपर्यंत समाज चालत
आलेला आहे.आणि यात लैंगिक भिन्नता असलेला समाज उपेक्षितच राहिला आहे.कारण समाजात
बोलतांना पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्दांनाच व्याकरणात उपलब्धी आहे.समाजात
त्यांना स्थान आहे.संधीच्या उपयुक्तता आहेत.परंतु अजूनही हिजडा समाजाला सन्मान
नाही की जो न्यायालयाने काल कायदा पास केल्यावर निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.आज
बोलीभाषा नष्ट होत आहेत.प्रमाण भाषेच्या वापराने बोलीभाषेचे शब्द लिखाणातून बाद
होत आहेत.भाषा अशी नष्ट होत आहे. आपल्या भाषेत आपल्याला बोलता आलं नाही तर उसन्या
भाषेने केव्हा बोलणं करता येईल?म्हणून आपल्या भाषेत आपले
प्रश्न मांडले पाहिजे. साहित्यविचार आणि निर्मिती याला महत्वाची भूमिका देणारे
आहे.साहित्यातील नायक,नायिका ह्या अन्याय सहन करणाऱ्या
नसल्या पाहिजेत.त्या झुंजार लढाऊ वृत्तीने व्यवस्थेला शह देणाऱ्या असाव्यात.ह्या
नायिका अण्णाभाऊंच्या लिखाणात येतात.याचबरोबर पारंपरिक साहित्याची मानसिकता बदलली
पाहिजे.संज्ञा,संकल्पना रूढार्थाने कोरून तिथे नव्या उभ्या
केल्या जाव्यात. पुरुषातही स्त्रीत्वाची भावना असू शकते हे स्विकारले पाहिजे.आणि
स्त्रीत्वालाही पुरुषी किनार असू शकते. प्रतिमा आणि प्रतीकांचा लढा आता मूल्यांकडे
झुकला पाहिजे.यासाठी जे जगतो त्या भाषेची मांडणी साहित्याने आणावी तेव्हा
वास्तवाला न्याय देता येईल.
1990 नंतर खाऊजा धोरण अर्थव्यवस्थेत आले.आणि जगाची दिशाच बदलली. जगण्याच्या पद्धतीने नवे वळणं घेत नवा अर्थकरणाचा पायंडा पाडला.जे जगणं बदललं ते लिखाणातून अभिव्यक्त केलं जावं.आजचा कास्टिंजम जातीने नाही तर अर्थकारणाचा मुखवटा आहे.अर्थक्रांतीच्या ध्रुवाला वळविण्याचे षडयंत्र आहे.नव्वदिपूर्वीच याची पातळीयुक्त घडी बसविण्यात आलेली आहे.यामुळेच मानवी मूलभूत गरजा भागविण्यासाठी ज्या नव्या विचारांचा शिरकाव झाला तो शहराने मोठ्या प्रमाणात उभा आहे.यात मुख्यत्वेकरून सेक्सवर्कर,हमाल,भिकारी,कष्टकरी,मजूर,
कामगार यांना वापरून ब्युरोक्रोसीला पूरक व्यवस्था निर्माण केल्या गेली.गरजा भागविणारी यंत्रणा उभी राहिली.कारण नव्वदीच्या काळात स्थलांतरित प्रमाण हे बहुसंख्य आहे.गावातला गरीब व मजूर शहराने धावू लागला.त्याच्या शारिरीक,लैंगिक गरजा भागविण्यासाठी पेठा निर्माण झाल्या.दलालगिरी जोडून गुंडगिरी निर्मिल्या गेली.आज शरीरविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये बहुजन समाजातील स्त्रिया मोठ्या प्रमाणात आहेत.तिथे उचचवर्णीय,काचेतील महिला सापडत नाहीत.अपवाद वगळता.पण अजून औद्योगिक आणि ब्युरोक्रोसी व्यवस्थेने भाडेतत्वावर बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड आणि लैंगिक गरजापूर्ण करून देणारे दलाल,ऍप्स,पेठा व चौक निर्माण करून इथेही बहुजन स्त्रीच्या आर्थिक संधीवर घाला टाकला आहे.हा खाऊजा धोरणाने नवा अर्थकारणाचा अजगर इथे सोडला आहे.
जाहिरातींच्या व माध्यमांच्या हिरोगीरीने आणि एनजीओनी सेक्सवर्करला कंडोम देऊन ते फ्री आहेत.यामुळे एड्स तत्सम आजार टाळता येतात म्हणून कहर केला.सेक्सवर्करच्या जाणिवांना वासनेच्या कांडात लोटून टाकणाऱ्या कंडोमच्या वाटपाने पुरुषसत्ताक व्यवस्थेशाहीचा कणा ताठ केला आहे.इथे मानसिकतेने,शारिरीक,आरोग्याने झिजते आहे ती केवळ स्त्री.नव्वदीच्या काळात शहरात आलेले स्थलांतरित शरीरसुख करण्यासाठी या पेठांनी जाऊ लागले. सरकारकडून मोफत मिळणाऱ्या कंडोमच्या सहाय्याने आपली गरज भागवू लागले.आणि नंतर गावी गेल्यावर आपल्या घरच्या स्त्रियांना भोगून नवी सुदृढ पिढी निर्माण करू लागले.कारण या व्यवहारी शरीरविक्रय करणाऱ्या व्यवस्थेत प्रजोत्पादनासाठी कोणत्याही भूमिका समाजाने मान्य केलेल्या नाहीत.यामुळे सरकारला व पुरुषसत्ताक ब्युरोक्रोसीला उपयुक्त कामगारी पिढी निर्माण व्हायला मदत झाली आहे.कंडोम कसा लावायचा हे सांगण्याचे कामं सरकारच्या वतीने एनजीओज आणि स्वयंसेवी संस्था,सोशल वर्कर्स करू लागले.लैंगिक पिळवणुकीच्या ह्या नव्या संज्ञा ह्या काळात निर्माण झाल्या आहेत.आणि याला ग्रामीण भागातील शहराकडे आकर्षित असलेला समाज बळी पडतो आहे.
याच धर्तीवर गाव बदलत आहे. गावाकडचा समूह जसा इकडे येत आहे त्याच वेगाने भांडवली व्यवस्थेचा विळखा गावाच्या कुशीत शिरतो आहे.शेती व उद्योग यात नवा बदल होतो आहे.जमीन, पाणी,मजूर आणि नैसर्गिल उपलब्धी सहज खेड्यात होत असतांना सरकारी धोरणं व उपाययोजना त्यानुषंगाने होतांना दिसतात. मग रस्ते वाहतूक वा बांधकाम असो. किंवा नागरीग्रामीण वसाहती निर्मिती असो.गावात पक्क्या घरांची बांधणी किंवा लघु उद्योगी व्यवसायांचे जाळे असो हे खेड्याने पसरत आहे.प्रामुख्याने डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या गावाच्या व्याख्येत नवी धोरणं आली आहेत.खालचे आणि वरच्या गावचे जातींवार जे विभाजन होते ते दृढ झाले आहे.जितक्या जाती तितके गावचे तुकडे पडले आहेत.हितसंबंधावर आधारलेला गावगाडा एकीकडे नष्ट होत असतांना तितक्याच कसोटीच्या आधारावर समाजाला तडे बसत आहेत.गरजेचे अर्थकारण घेऊन असलेला गाव आज विसंगत झालेला वाटतो.आणि नव्या अर्थकारणाचा छाप गावावर बसला आहे.पूर्वीचा गाव कसा निर्माण झाला. त्याची बुद्रुक,लहान,मोठं,वाडी,वस्ती,कसे झाले?
हे साहित्याने हेरलं पहाणे गरजेचे आहे.खेड्याकडे चला हा गांधीचा आणि खेडे सोडून शरहराकडे या हा आंबेडकरी विचारांचा विरोधाभास समजला पाहिजे. गावाची आवकळा कशी व का झाली आहे हे लक्षात घेऊन नवे उत्तरं शोधले पाहिजे.कारण व्यथावेदना तिथे रडत आहेत.त्याची कारणे या नव्वदीनंतरच्याअर्थ,समाज,
धर्म,राज,नीती,शिक्षण,आरोग्य, राजकारण या ध्रुवीकरणात दिसून येतात.गावातील विषमता अजून कुठे नष्ट झाली? समानतेची वागणूक कोणत्या समाजाला मिळते.अजूनही दलितांवरील अन्याय-अत्याचार माणुसकीच्या नात्याने थांबले आहेत का? गुलामी नष्ट झाली आहे का?मालक व मजूर संघर्ष शांत झाला आहे का?असे आज अनेक प्रश्न तसेच आहे.ते सुटलेले नाहीत. आणि एकीकडे गाव बदलत आहे.आधुनिक यंत्रसामुग्री तिथे येत आहे.गावही काही अर्थाने डिजिटलायझेशनकडे वळत आहे.स्मार्ट होत आहे मात्र मानसिकता ही अजूनही देवळात धर्मत्व आणि अंधश्रद्धा निर्माण करण्यात तल्लीन आहे.माणसाला माणूस म्हणून नाही तर प्राण्यासारखी वागणूक देण्यात धर्म मानत आहे.हे चित्र बदलण्याचे आव्हानं लिहिणाऱ्या- वाचणाऱ्या- बोलणाऱ्या तसेच अभिव्यक्त होणाऱ्या माध्यमांवर,व्यक्ती, समूहांवर पडलेले आहेत.काल इतिहासात नव्हत्या तितक्या समस्या ग्रामसंस्कृतीवर येऊन ठेपल्या आहेत.म्हणून गावातल्या विषमतेवर परखंडपणे लिहिलं पाहिजे.वास्तव मांडलं पाहिजे.
इकडे शहरांना सूज आली आहे. येणाऱ्या स्थलांतरचा भरणा शहरी भोपळ्यात होतो आहे. आणि हा भोपळा फुगून जातो आहे.नव्या समस्या व प्रश्न निर्माण होत आहेत.शहराकडे येतांना वेशीवर जात गळून पडते आणि पुन्हा गावात जातांना ती वेशीतच अंगाला चिटकते.गावातून अर्थकारणाची धग बसलेल्या पाटलालाही इथे शहरात येऊन कामगारी जिणं जगणं भाग पडते आहे.की जो एकेकाळी धनिक आणि दौलतज्यादा असणारा गावकुसात होता.भांडवली अर्थव्यवस्थेने उत्पादन,विक्री,हिशोब,नफा,तोट्याचे राजकारण मानवी मुलभूत गरजांना दुय्यम ठरवून औद्योगिक विकासाला खतपाणी टाकण्याचे आज कोणत्याही देशात चित्र डिअर आहे.जगाचे अर्थ,समाज, राजकारण याला जबाबदार आहे.यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो आहे.मानवी जीवनमान घटत आहे.आणि आरोग्ययंत्रणा खिळखिळी होतांना पुढे येत आहे.काळ झपाट्याने बदलत आहे आणि याला जोडून मानवी हालचालीही तत्परतेने बदलाची भाषा स्वीकृत करत आहेत.या आव्हानांचा तिढा सोडवण्यासाठी यत्न घेतले पाहिजेत.काळ आकलन केला जावा.

Comments
Post a Comment