***प्रासंगिक***
साधना साप्ताहिक वर्धापन विशेषांक
-स्मरण "राग दरबारी" कादंबरीचे-
पत्रकार भवन-पुणे
राग दरबारी (1968)
-श्रीलाल शुक्ला(IAS)
जिलीयन राईट ने इंग्रजी अनुवाद केलेली साहित्यकृती
-----------------------(-एक विश्लेषण-)
ग्रामीण भारताचे व्यंगतम,आणि उपहासात्मक लेखन या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
भारतीय मानवी नीतिमूल्ये व विवेकसरणीचा ऱ्हास होत असलेली स्वातंत्र्याच्या कवळ्या वयातली परिस्थिती आणि उत्तरी भारतीय प्रांतातील शिवपालगंज ग्रामचे वर्णन.हे प्रामुख्याने आजच्या कोणत्याही भारतीय खेड्याचे-शहराचे किंवा महानगरातील मानवी जीवनाचे संदर्भाने येणारे वास्तव आहे.
भारतीय साहित्य शास्त्रातील ही पहिली व्यंगतम कादंबरी असण्याला आधार आहे.कारण मुळात श्रीलाल शुक्ला यांची व्यंगपूर्ण भाषाशैली जशी जीवनशैलीने अंगीभूत आहे तीच या लिखाणात उर्धुत्व होत राहते.आणि ओघानेच Istopiya-अराजकता,भ्रष्ट शासन,सडकी व्यवस्था व पुरुषप्रधान संस्कृतीवर घाव घालत विनोदपूर्ण विवेकाने परिवर्तनाचे वारू ठरलेली "राग दरबारी"ही कादंबरी पहिल्या दोन दशकात वादचर्चेत अडकली.
आजही मानवी वस्तीच्या केंद्र स्थानी स्त्रीसत्ताक व्यवस्थेच्या परिघाबाहेर स्त्री पुरुष रचना व वास्तव मूल्यविहीनता,गावाचं राजकारण,निवडणूक, भ्रष्टाचाराने माखलेले राजकारणी हस्तकं बोलकं वास्तव आहे.आणि हाच धागा अनावधानाने शुक्ला त्याकाळात मांडतात.यातही ते दुर्दैवाने भारताचे भविष्य असे असेल हे सांगताना लिखाणातून विजयी वाटतात.
सणीचर-हे पात्र दलित सरपंच आहे.गावप्रधान आहे.तो म्हणतो की,
"वैद्यब्वॉसाठी मत द्या मला राजकारणाचं काही कळत नाही....तेच आपल्या गावचे कर्ते आहेत!"
ही मानसिकता असलेलं ते विचाराच्या कह्यात असलेलं पात्र आहे.आणि विचाराने लाचार झालेलं, व्यवस्थेने वापरून घेतलेलं पात्र गावागावात पहायला मिळते.
लंगडा- हा सामान्य माणूस की जो जगत असतांना "व्यवस्था जे ठरवेल ती पूर्व दिशा आणि तोच न्याय जो मोठे लोकं ठरवतील"असे मानणारा आहे.
हे दोघे भारतीय स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या लोकशाहीचे स्वरूप आहे.जी आज समाजाच्या नीतिमत्तेच्या अंगाने लागू पडते आहे.समाजात आजही सद्गुणांचा ऱ्हास होतो आहे,दुर्गुण वाढत होत आहे.
सडलेल्या,खोकला झालेल्या गावचे रुपडे कादंबरीत येते.
शुक्लांनी1964 पासून ह्या विषयाचे लेखन करत 1967 ला"राग दरबारी"म्हणून प्रकाशन झाले ते आज दोन लाख प्रतीवर गेले आहे.या संदर्भात समीक्षेत आणि साहित्यमोर्च्यात वादविवाद घडत बिघडत गेले तशी कादंबरीच्या समीक्षा विश्लेषणात झालेलं आहे. यामुळेच विचारधृवावर
"पोकळ आदर्शवाद संघर्षामुळे नेहरू युगाचा अस्त होतो की काय?
गांधीवादाचे तत्व मागे पडते आहे काय?"
याचे उपहासात रूपांतर होऊन ही कादंबरी 1980 पर्यंत उपेक्षितच राहिली.कारण रूढ कल्पनांना हादरा देणारा विचार व तत्वसाठा या लिखाणात दिसून येतो.विनोदाची शर्करावगुंठीत झालर त्याला असल्याने एक वेगळा बाज आलेला आहे.बेगडी आदर्शला सुरुंग लावणारा,विचारांचे नैतिक उदासिन्य व राजकारणाचा भ्रष्ट चेहरा यात दिसतो.
कालांतराने नव्वदिच्या काळात खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाने या विषयाला थारा मिळाला.हा थारा मिळणे म्हणजे भारत अजून वैकसिकदृष्ट्या मागास होणे होते.हे सत्यत्व ही कादंबरी सांगू लागते.तेव्हा येथील राजकारणी,धर्मांध व सत्ताहुकूमशाही व्यवस्था बुद्धिजीवी वर्गाला विकासप्रक्रियेतून बाहेर पाडत आहे. आणि आपसूकच त्रागलेली ही बुद्धिजीवी मंडळी या हुकमी परिघाच्या बाहेर पळत आहे.वास्तवापासून दूर जात आहे.
इतिहास तर बुद्धिवादी मंडळीला गोळ्या घालणारा विचार उगलेला आहे.
या कादंबरीत स्तर दिसतात.त्यातला पहिला स्तर हा भीतीत जगणारा सामान्य माणूस-वेदना पीडा व अस्वासने अंगीकारत जगत आहे.ना जिवंत ना मेलेला अशी त्याची अवस्था झालेली आहे.दुसरा स्तर-दहशत,दडपण व "बुद्धिजीविंची इथे आम्हांला गरज नाही" हे बोलणे खाणारा हा माणूस यात मोडतो.तो मानसिकतेने अस्थिर होतो आहे,तो काही करू शकत नाही.लिखाण,विश्लेषण,काळाची समीक्षा सांगू शकेल, परंतु बाकी काही करू शकणारा नाही....
तिसरा वर्ग-कलाकार व महत्वाचा-निर्मितीक्षम,सर्जनशील व अन्यायी व्यवस्थेला तो विरोध करणारा असतो.त्याला हा बदल हवा असतो.परिवर्तनाची नांदी घेऊन असतो.पिळवणूक त्याला मान्य नसते.हिंसाचार व दंगली योग्य वाटत नाहीत.मानवतेला पूरक जीवन त्यांना हवे असते.म्हणूनच सजगतेने या कादंबरीतून निषेध होतो हुक्मि व्यवस्थीय नियंत्रणाचे.व्यवस्थेची संघर्ष करणारे यात विचार येतात.कारण सर्वसामान्य माणसाची वेदना यात आहे.म्हणून वास्तवात आज दोन अमूर्ततात संघर्ष होत असलेला दिसत आहे.दोन स्तरामुळे जीवन व साहित्य वेगळे ठरविण्यामुळे अशी कलाकृती निर्माण करू शकलो नाहीत ही आजही विनोदी कादंबरीच्या सृजनशील-परिवर्तनाचे ठाव घेमरे निर्मिती प्रक्रीयेत खंत सांगणारे आहे.
सरकारी शासनाच्या जनसेवेत असतांना आपल्याच व्यवस्थेवर कडक टीका करणारे शुक्ला हे एकमेव आहेत.
"नोकरी जाईल...नाव बदला कादंबरीचे"
हे म्हणणारे नातेवाईक व स्नेही.व त्यांच्या प्रभावाने चलाखवृत्तीने "राग सरकारी"चे नामकरण "राग दरबारी" झाले.राग सरकारी हे पूर्वी नाव होतं.मुळात शुक्ला यांचे इंग्लिश,राजकारण व संस्कृत विषय त्यांचे होते.केवळ बुद्धिमान होऊन चालणार नाही चलाख असलं पाहिजे.हे श्रीलाल जाणून होते.यार्थी मुख्यत्वे पाहिलं तर जॉर्ज ऑरवेल यांच्या "ANIMAL FARM"शी हे नाते जुळते.
तर USAची "कॅश22" ही कादंबरी मेळ खाते.तेव्हा या कादंबरीला विश्वसाहित्याची किनार लाभते आहे.
यातील सैनिक पात्र म्हणते की,
"मला शत्रू मारत नाही.सरकार व अधिकारी मला मारत आहेत....!"
या शैलीत संयम आहे.जखम करणारी नाही.बोचकारे घेते.
"राग दराबारीत"ही तारेवरची करसत केली आहे.
1980 ला शुक्ला-हर्डीकर-लखनौ-भेट होते तेव्हा हर्डीकर म्हणतात की,
"रंगनाथ या कादंबरीचा नायक नाही.
वैद्यजी नायक ठरतात.ते सर्व सूत्र सुप्त हलवीत असतात.
जसे की पुण्याचे हस्तक-शरद पवार....!"
शिक्षण,ग्राम,व संस्था हातात घेणारे विचार वैद्य पात्राकडे आहेत पण ते म्हातारे आहेत सत्ता काबीज करणे ही त्याची हाव आहे.भारतीय नैतिक व्यवस्था इथे दर्शन घडवते.साहजिकच उत्तरी ब्राम्हणी व्यवस्था वर्णन त्यात येते.सनीचर-हे पात्र की ज्याचे मंगलदास असली नाव आहे ते केवळ वैद्य म्हणत असतात....
"ही आतली दुखरी व मार्मिक बाजू आहे....!
स्वातंत्र्य प्रथमतः लवचिक व प्रखर होते.स्वातंत्र्यावरचा विश्वास व आजचे वास्तव याचे अधोरेखित करणारी प्रणाली राग दरबारीत येते.घरातली सत्ता मिळविण्यासाठी मुलगा बापाला मारहाण करतो व नवी सत्ता प्रस्थापित करतो ही उत्तरी रीत यात सापडते. खरे तर पशुप्राण्याचे हे जीवन वास्तव मानवी वस्तीत शुक्ला सांगतात.ह्या वेगळेपणाची मार्मिकपणे मांडणी कादंबरीत सापडते.
साहित्य अकादमीने 1969 ला "राग दरबारी"ला साहित्य अकादमी दिली.प्रामुख्याने मराठी साहित्यात स्वातंत्र्याच्या पार्श्वभुमीवर
"ही का कल्पद्रोमाचे फळ" -ना.सी.
"सोनेरी स्वप्न पण भंगलेले" -वि.स.
ही संदर्भ साहित्य निर्मितीने लागतात.
"स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य फसले आहे..."
हे खंबीरपणे सांगणारी ही कादंबरी आहे.
या कादंबरीचे त्रोटक म्हणजे यात महिला पात्र खूप कमी आहे.ही खंत आहे आशयाची होऊ लागते की काय असा प्रश्न पडू लागतो.
"पुरुषाचा दोष होऊच शकत नाही.
तर स्री ही अपराधी असते....."
ही उत्तरी भूमिका इथे वैद्य नावाच्या पात्रतोंडून शुक्ला सांगू लागतात तेव्हा शुक्ला प्रखरपणे मत व्यक्त करतात.ते हिचकीच करत नाहीत.स्पस्ट बोलू पाहतात.सहकार क्षेत्रात तर भ्रष्टचाराची कमी नाही.वैद्य या पात्राची नीतिमत्ता ही उत्तर भारतीय ब्राम्हणी व्यवस्थेच्या प्रतिमेची,समाजाची आहे.
आज स्वतःचे कौशल्य विकणारे भांडवलशाही जग उभे राहिले आहे.वर्तमान संबंध या कादंबरीत सापडतो.भूतकाळात नाते मिळते व तत्कालीन वास्तव यात येते.आणि भविष्यसाठी यातील योग्य विचार इथे लिखाणात सापडतात.म्हणूनच रंगनाथ विफलतेचा नायक आहे.ती विफल्या अवस्था निर्माण केल्या गेली आहे.आणि विफल्याला नकार देणारे शुक्ला"राग दरबारी" गातात.म्हणून सर्वांनी वास्तव वाचावे यासाठी ही कादंबरी नजरेखालून घालावी अशी एक आहे.

Comments

Popular posts from this blog