***ग्रेट भेट+पत्र+प्रेस व्हिजिट***
***जेव्हा संमेलनाला
विद्यार्थी जातो***
**सहावे अखिल भारतीय सम्यक
साहित्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिर पुणे ***
{यशवंत मनोहर अध्यक्ष
अध्यक्षीय भाषणावर अभिप्राय}
सप्रेम जय भीम सर,
जानेवारीतल्या संमेलनाच्या 11,12,13,या दिवशी प्रत्यक्ष भेट झाल्याचा आनंद अजूनही काळजात घर करून आहे.तुमची उच्चारलेले ती शब्दे की,
"हे नक्की वाचा पोरांनो.उद्यासाठी उपयोगाचे आहे..!"
अगदी हे शब्द लिहितांना मी सर तुमचे उत्थानगुंफा ते सप्तरंग मधील निवडक लेख, आंबेडकर चळवळीतील अंतर्विरोध आणि दलित साहित्य सिद्धांत: स्वरूप वाचलं. त्यादिवशी हातात मिळालेला अध्यक्षीय भाषण खंडाचंही वाचन केलं.आणि अभिप्राय लिहावा म्हणून विचार करत होतो.
तसे मी अध्यापकीय शिक्षण घेत असताना या काव्यसंग्रहाची एक प्रत हाती आली.पूर्ण वाचली.बव्हंशी डोक्यावरून जात होती.पण ती विकत घेऊन येवोस्तोरवर पुन्हा पुन्हा वाचत राहिलो.तीन वेळा ती वाचत गेलो. शिरपूर-धुळे येथून उत्थागुंफा पुन्हा विकत घेतली.तेव्हा समाधान वाटलं.आजही ती प्रत संग्रही आहे.तेव्हा वाचताना वाटत होतं की,
"किती खोलवर विचार करत माणसं..."
"आणि काय जगत असतील.निस्सीम.पूर्णांशाने...!"
" केव्हा भेटू आपण अशा विचारी लोकांना." "केव्हा मुलाखत होईल."
"कधी बोलता येईल.अशी कल्पना घेऊन विचार करत होतो.
आता पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून शिकत आहे.साहित्याचा अभ्यास करताना तुमच्या इतर साहित्यकृतीही वाचनात येऊन गेल्या. विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.मनोहर जाधव सरांच्या तासाला तर तुमच्या बोलण्यात असणाऱ्या आंबेडकरवादी मतप्रवाहाचे विश्लेषण अगदी आग्रहाने ते सांगतात.गेल्या वर्षीच्या सेमिस्टरला वैचारिक साहित्य हा विषय घेतला.तर तुमच्या विचारांचा ठावच घ्यायची ईशा बाळगून आहे ती ईथवर आणि आजवर.डॉ.जाधव सर अस्मितादर्शचा इतिहास,नामांतर चळवळ,दलित साहित्याच्या तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक स्थिती सांगताना खूप खूप गोष्टी खूप मार्मिक व समीक्षेची साधने हाताळत सांगतात.त्याबाबतीतही तुमच्या विषयी माहिती आणि वैचारिक साहीत्य विषयी सखोल अशी चर्चा घडून येते.
"तिमिरातुनी तेजाकडे"हे आपलं सदर नियमित वाचत आलो आहे.पहिल्यांदा याचा मला खूप जड शब्दशः अर्थाने चिकित्सक अभ्यास अवघड वाटत होता.पण वाचत होतो ते काहीतरी मोलाचे आहे म्हणून अवघड करून ठेवलेले असते ही लहानपणाची वेडी धारणा घेऊन वाचत होतो.
एक लेख दोन तीन वेळी वाचून घ्यायचो.तुमचे लेखन आणि "फिरस्तीकार" उत्तम कांबळे सरांच्या लेखाखेरीज राजन गवस सरांचंही लेखन आवडत होतं. तेही वाचू लागलो.ते विचार काहीतरी सांगू लागले होते.तुमची "रमाई" ही कादंबरी वाचलेली नाही.याविषयी ऐकून आहे.जशी मिळेल तशी पुढील काळात ती वाचून घेणार आहे.तुमच्या त्या एका कवितेतील शब्द पुन्हा पुन्हा स्मरतात,
"कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे..!"
या वाक्यात मला गाव,माझं घरचं शाऱ्यातल्या खालच्या एका गावाच्या दुःखाचं टळटळीत जिणं फोडासारखं वेदनामय जाचन वाटतं.हा रोग आपलाच आहे काय..??बिमारी फैलवणारा....
खरंच अजून शिक्षणाच्या प्रवाहाची धार या तळातल्या माणसाने पाहिली नाही.म्हणून की काय असे वाटू लागते,अजूनही गावकुसात धनिकांनी ठरवून ठेवलेले गुलामी जीवन रहाटगाडग्यासारखे सुरूच आहे.ही काळाची शोकांतिका आहे असं वाटतं.असा अडाणी समाज आणि ग्रामीण जाणिवा असतांना तुमच्यासारखी विषयांची जाण असणे आज गरजेचे आहे आहे.ती जाणिव तळागळपर्यंत पोचली पाहिजे असे वाटते.
तुमच्या भाषणातील जो तुम्ही सौंदर्यशास्त्राचा व नीतिशास्त्राचा उल्लेख केला आहे तो खोलवर अर्थाअर्थी सम्यक मूल्यव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा असा विचार आहे.कारण की सौंदर्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जे वाचत आहे,जे वास्तवात समाजात आहे त्याची ताळमेळ बसत असतानाच किंवा सखोल विश्लेषनीय हिशोब केला तर प्रस्थापित नीतिशास्त्र उलथून टाकावे असे वाटते.प्रस्थापित सौंदर्यशास्त्र हे शास्त्रदर्जा असलेले असतांना पडलेल्या बाजूचा ते विचार कधीच करतांना दिसत नाही.उलट त्याची बाजू बुजवून टाकण्यात शिवत्व ते मानत आहे.केवळ गोऱ्या कातडीचा शिवात्म दृष्टीने विश्लेषण आणि नीती सांगणाऱ्या शास्त्राला एकलखुऱ्या शास्त्राचा दर्जा द्यावा लागेल.आधाराच्या घराला जसे मोडायचे त्यासाठी आधारच काढून घेतला जातो.तसे हे प्रस्थापित सौंदर्यशास्त्र रंगाधर्माच्या कमीपणावरून मानवी घटकाला न्यून समजत जाते.आणि जगण्याचा जणू हक्कच हिसकावून आपली अस्तित्वता टिकवत राहते.वास्तविक पाहता रंग हे तर निसर्गतःच मिळतात.त्यात गोरेपान असणे हे सौंदर्यनिकष कसे ठरू शकेल??तसेच काळेपणा हादेखील सौंदऱ्याचा विषय कसा ठरेल??हे समजून आहे.तुम्ही मांडलेला संवाद जो आहे त्याला आंबेडकरवादी सौंदर्य शास्त्र म्हणणे उपयुक्त ठरते.कारण आंबेडकरवाद हा समता,बंधुत्व, न्याय व मूल्यजाणिवा निर्माण करणारा विचार आहे.त्यात हुकूमशाहीचे विरोध करणारे आणि समतेचा जागर घालणारे तत्त्व आहे.बाजारू मानसिकता निर्माण करून गुलामी व्यवस्थेचे पाईकत्व लादणाऱ्या सौंदर्याला जनतेने चुकीच्या भ्रमाने डोक्यावर घेतले आहे.हा भ्रम असा की,जे सौंदर्य मुळात अव्याख्येय आहे.अविश्लेष्य असे आहे.त्याची व्याख्या करता येत नाही.हे प्रस्थापित्व निर्माण करणाऱ्या शास्त्राला शास्त्र म्हणून अभ्यासकांनी का अंगीकारावे.???
अभ्यासक या नात्याने प्रस्थापित आणि विस्थापित्व निर्माण करणाऱ्या बाजू उचलून का धराव्यात .??असा सवाल उभा राहतो.या संवाद-वाद-विरोध तत्वाला समतोलता आली पाहिजे.
"रंगावंग्या दुनियेत कातडीला किती अनाठायी महत्व दिले जात आहे???की जी कातडी सरणाच्या पहिल्याच भपक्यात जळून ठिक्करकबाब होते.करपट वासानं नेस्तनाबूत होते.बाजारू मानसिकतेने रंगाचेही जातधर्म तयार केले आहे.काळं आणि गोरंभोरं हे कदापि सौंदर्य होऊ शकणार नाही.ते तर निसर्गतःच निर्माण होणारे रंग आहेत.त्यातल्या एकालाच सौंदर्यतत्व मानणे कितपत योग्य?मात्र सौंदर्यकल्पनांनी जाणिवांच्या कोटीवर रंगाची डाईंग करणारी विचारसरणी हे जाणायला तयार नसते.यामागे सामजिक नितीतत्व उभे आहे.की ज्या नितीशास्त्राला इथे भारतीय परिप्रेक्षात प्रेरीत होतांना धर्माच्या पदरात जागा मिळते.सौंदर्याविषयीच्या सामाजिक जाणिवाही थिट्या आणि विषम स्वरूपाच्या तत्वाने वसवल्या आहेत.लैंगिक समानता या तत्वज्ञानात नाही.मुळात पाहता सौंदर्याची व्याख्याच करता येत नाही.ते अव्याख्येय आहे.अविश्लेष्य असे आहे.त्याला कोणत्याच प्रकारच्या कसोटीत बसविता येत नाही.सौंदर्य ही बाब गुणात्मक असून केवळ ती बाह्यांग किंवा अंतरंगावर अवलंबून नाही.चांगुलपणा आणि विवेकाच्या सत्य वापरावर सौंदर्य विराजमान होत असते.म्हणून आज शैक्षणिक अंमल प्राप्त प्रस्थापित असलेल्या सौंदर्यशास्त्राची फेरमांडणी करावी लागणार आहे.
रावण आणि शबरीचे सौंदर्यशास्त्र नीतीच्या अंगाने मांडणे गरजेचे असतांना स्त्रीदेहाच्या विटंबना करणाऱ्या प्रस्थापित सौंदर्यशास्त्रास्र शास्त्राचा दर्जा मिळावा??हा प्रश्न डोक्यात होता.विचार करत होतो. साहित्याचा अभ्यास करताना फर्ग्युसन कॉलेजच्या मराठीचे प्रा.आगळे सरांशी तासांमधून चर्चा घडत होती.तुकाराम-कबीर यांनी दिलेले नीतीतत्व सद्याच्या सौंदर्यशास्त्रातून निर्मिती होत नाही.तर उलटपक्षी बाजारू विचारसरणी सामाजिक नीतिमत्तेच्या बाजूने उभी राहते आहे.आज वास्तवात सम्यक शिकवणी कमी कमी होऊ लागली आहे.या काळात शरद पाटील यांचे सौंदर्यशास्त्र वाचून झाले आहे.
कामगारी,श्रमिक,मजूर,कष्टकरी तळहातावर ज्यांची पोटे असतांना किंवा जे भूक भागविण्यासाठी जिवाचे रान करत आहेत.ते लोकं बाह्य आकर्षित सौंदर्यासाठी इभ्रतीचे लचके पैशावारी बाजारात विकणार्या मानसिकतेला आर्थिक मक्तेदारीने ग्रासून घेतले आहेत.हा काळ किती छचोर जिणं जगवीत आहे.याने जीव पिळवटून निघते.तर आपली बालगंधर्वाच्या आवारात झालेली भेट अविस्मरणीय आहे त्या दुसऱ्या सत्राच्या एकदा मध्यंतरीच्या काळात आपल्याला आपल्याशी झालेला वार्तालाप खूप काही सांगणारा आहे. काळजावर ते सगळे गहन शब्द कोरले गेले आहेत.वैचारिकतेने फुले-शाहू-आंबेडकर या तत्त्वांत असलेल्या माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला पाठीवर हात टाकून मनमोकळेपणानं बोलले,गुजगोष्टी केल्या,धन्य पावलो.अध्यापकीय शिक्षण घेत असतांना केलेला विचार पूर्ण झाला.
या टप्यावर सांगू इच्छितो की, यानुषंगाने प्रस्थापित साहित्यिक नवख्यांना वारा लागू देत नाहीत.हे अनुभवांती सांगतो. तुमच्या त्या अध्यक्षीय भाषणातील अर्थपूर्ण आणि आर्यपूर्व भारतीय सिंधू संस्कृती विषयीचा विचार अत्यंत मोलाचा वाटला. म्हणजे 19व्या शतकातील महात्मा फुलेंनी परखडपणे विचार मांडला तो विचार मूल्याधिष्ठित व सर्वानुमते समानतेचा विचार ठेवला होता.जे सांस्कृतिसापेक्ष तत्वज्ञान दिले गेले.त्यानुषंगाने आपले विचार आजच्या पिढीसाठी मोलाचे वाटतात.फलप्रमाण्यवादी जॉन ड्युई पटू लागला आहे.ती कालची गरज आहे.असे सांगतांना डी.एन.ए.ची संदर्भितेही निगरगट्ट विचारसारणींशी लागेबांधे सांगू लागतात.हे नाही पटले तर विद्यार्थी न होणे सोयीस्कर.संविधानाबद्दलची नव्या पिढीकडून असणारी अपेक्षा आणि कर्तव्ये अमच्यासारख्या नवख्यांना समजून सांगणे किती मोलाचे आहे.हे विचार पटत जातात.कारण संविधान नष्ट करणाऱ्या विचारसरणीच्या सत्तालोलुप हुक्मि व्यवस्थेच्या काळात आम्ही जगत आहोत.आम्हांस स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय असेल तर तो फक्त संविधानी शब्दानेच आहे.हे पुढील पिढीस कळले पाहिज.ह्या हेतूने लिहिलेले अध्यक्षित भाषण मला काळपटलावर परिवर्तनाचे शब्दसांर्थयात्मक बळ असते हे जाणवायला लागले आहे.
विवेकशील माणूस घडविणे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे साहित्यिक, व्यवहार,आणि विचार तयार करणारा आपला एक विचार हा आज तितकाच अमूल्य आहे.शोषणयुक्त व्यवस्थेत पिढीचे अस्तित्व व मूल्यात्मक संघर्ष तुमच्या शब्दाने आयुष्यभर विचारात कोरल्या गेला आहे.
आज मिळणाऱ्या विचारांच्या पुरस्काराला आपल्या विचारांचा ठाव घेणाऱ्या नवख्या विद्यार्थ्यांकडून सर आपणास पुढील आयुष्याला हार्दिक शुभेच्छा.....!"

Comments
Post a Comment